Happy Narak Chaturdashi 2025 Wishes : दिवाळी हा प्रकाशमय दिव्यांचा, उत्साहाचा सण मानला जातो. हा सण आपल्याकडे थाटामाटात, उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा केला जातो. वसुबारसपासूनच दिवाळी सणाचे वातावरण पाहायला मिळते. पण, आपण नरक चतुर्दशीपासून दिवाळी सणाला सुरुवात करतो. या वर्षी नरक चतुर्दशी २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केला जाणार आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक मराठी घरामध्ये या सणाचा आनंद घेतला जातो. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. यंदा या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता. पूर्वी भेटून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जायच्या. आता जग बदललं तस डिजिटल शुभेच्छा दिल्या जाऊ लागल्या. तुम्ही सुद्धा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यालच.
पण त्याच त्याच शुभेच्छा देण्यापेक्षा यंदा काहीतरी हटके आणि वेगळ्या शुभेच्छा द्या. ज्यातून तुमच्या भावनाही पोहोचतील आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा फुलेल. याचसाठी या लेखात आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा एक हटके दिवाळी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे वाचून सर्वचजण मनापासून आनंदित होतील.
नरक चतुर्दशीच्या खास मराठमोठ्या शुभेच्छा ( Happy Narak Chaturdashi 2025 Wishes In Marathi)
१) श्रीकृष्णाने जसा नरकासुराचा केला नाश, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश; नरक चतुर्दशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

२) आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो! नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!
३) नरक चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर आयुष्यात आपुल्या, नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी
नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!

४) सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो!
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख-समृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

८) लक्ष दिव्यांनी उजळली निशा,
घेऊन नवी उमेद नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा!
Diwali Wishes In Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी
चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!

गेले काही दिवसांचे
अंधारमय अनुभव पुसून टाका
नवा प्रकाश, नव्या उर्जामय आठवणी घेऊन
ही #दिवाळी साजरा करा…
सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा