scorecardresearch

तुम्हालाही आहे जेवल्यावर लगेचच पाणी प्यायची सवय? जाणून घ्या या सवयीचे गंभीर तोटे

ज्या व्यक्ती जेवल्यावर लगेचच पाणी पितात त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवताना पाणी पिणे टाळायला हवे. (Photo : Indian Express)

पाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. असे म्हणतात आपल्या शरीराचा ७० टक्के भाग पाण्याने बनला आहे. आरोग्य तज्ञ देखील दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवताना पाणी पिणे टाळायला हवे. जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. ज्या व्यक्ती जेवल्यावर लगेचच पाणी पितात त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

आरोग्य तज्ञांनुसार खाल्लेले अन्न पचायला जवळपास २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जेवल्यावर किमान ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. तसेच, जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे.

Photos : मधुमेहाच्या आजारावर ‘ही’ फळे ठरतात फायदेशीर; आजच आहारात समावेश करा

योग्य वेळी पाणी प्यायचे फायदे कोणते?

  • जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
  • योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर आणि मजबूत राहते.
  • पोटात गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होणार नाही.
  • शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते.
  • योग्य वेळी पाणी प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

उन्हाळ्यात भरपूर दही खा; आरोग्यासाठी आहे अतिशय उपयुक्त, होतील ‘हे’ चार फायदे

जेवल्यानंतर लगेचच पाणी पिण्याचे तोटे कोणते?

  • लठ्ठपणा
  • पचन समस्या
  • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची समस्या
  • पोटात गॅसची समस्या

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you also drink water immediately after eating learn the serious disadvantages of this habit pvp

ताज्या बातम्या