Health Tips : बर्‍याचदा तज्ञ अशा काही गोष्टी रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला देतात , जे केवळ आरोग्यासाठी चांगले नसतात तर अनेक समस्यांपासून दूर राहण्यास देखील मदत करतात. अशा परिस्थितीत काही लोक सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तांब्याचे पाणी सेवन करतात. मात्र , तांब्याच्या पाण्याशिवाय मडक्याचे पाणी देखील सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर जाणून घेऊया रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे तसंच कोणते पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

शिळ्या तोंडी कोणते पाणी पिऊ नये?

शिळ्या तोंडी सकाळी उठून जर तुम्ही पाणी पित असाल तर रेफ्रिजरेटरचे पाणी कधीच पिऊ नये. हे आरोग्यास हानी पोहोचवू शकते. जर एखाद्या व्यक्तीने रिकाम्या पोटी फ्रीजमधील पाणी प्यायले तर त्याचा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम तर होतोच पण त्या व्यक्तीला पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. फ्रीजच्या पाण्यामुळे आतड्यांमध्ये सूज येऊ शकते आणि बद्धकोष्ठता, अपचन देखील होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यावे?

सकाळी शिळ्या तोंडी जर तुम्ही पाणी पित असाल तर , त्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट तर राहतेच पण त्यामुळे शरीराचे तापमानही कमी होते. मडक्याचे पाणी शरीराला थंड ठेवते आणि शरीरात साचलेल्या विषारी पदार्थांना बाहेर काढण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याशिवाय मडक्यातील पाण्याचे सेवन केल्याने शरीरात पित्त संतुलित राहते आणि पोटाच्या समस्यांही दूर होतात. त्यामुळे रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन जर तुम्ही करत असाल , तर तांब्याच्या पाण्यासोबतच मडक्यातील पाण्याचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी चांगले आहे.