जशी घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे घरातील फ्रिजसुद्धा वेळोवेळी स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. फ्रिजमध्ये आपण खाण्याच्या वस्तू ठेवतो. त्यामुळे फ्रिज खराब येऊन त्यातून दुर्गंध येऊ शकतो. यामुळे पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यताही वाढते. म्हणूनच फ्रिज स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेकांना फ्रिज स्वच्छ करणे, खूप अवघड काम वाटते. परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने आपला फ्रिज स्वच्छ करू शकतो. आज आपण फ्रिज स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हाळ्यात लोकांना मोफत थंड पाणी मिळावं म्हणून पठ्ठयाने केलं असं काही; सोशल मीडियावर होतंय कौतुक

  • सर्व प्रथम, फ्रीजमध्ये असलेल्या सर्व भाज्या आणि फळे बाहेर काढा.
  • फ्रीज डी-फ्रॉस्ट करा. फ्रीजच्या पायथ्याशी जाडसर कागद पसरवा. जेणेकरून बर्फ वितळल्यावर कागद ते पाणी शोषून घेईल.
  • जर तुमच्या फ्रिजला दुर्गंध येत असेल तर बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या रसाने वास दूर करता येईल.
  • एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात मीठ विरघळवा. फ्रीजमध्ये कापड बुडवून आतून नीट पुसून घ्या. फ्रीज काही तास उघडे ठेवा.
  • भाजीचा ट्रे बाहेर काढा आणि नीट धुवा. ते सुकल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.
  • फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न जास्त वेळ राहू नये यासाठी प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा ते झाकून ठेवा. अन्यथा, त्याचा वास संपूर्ण फ्रीजमध्ये पसरेल.
  • फ्रीजमधील सर्व बर्फ वितळल्यानंतर आणि तुमची साफसफाई पूर्ण झाल्यावर, एक एक करून वस्तू परत ठेवा.