Types of Paithani Saree : महाराष्ट्रात पारंपारिक साड्यांमध्ये सर्वात लोकप्रिय साडी म्हणजे पैठणी साडी. पैठणी ही हातमागावर विणलेली साडी आहे, त्यामुळे या साडीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्कृष्ट कारागिरी आणि वैशिष्ट्यांमुळे या साड्यांची मागणी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर आहे. महाराष्ट्रातील पैठण या शहरातून पैठणी साड्यांचा उगम झाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तु्म्ही आजवर अनेक पैठणी साड्या पाहिल्या असेल पण तुम्हाला पैठणी साड्यांचे प्रकार माहीत आहे का?

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पैठणी साड्यांचे प्रकार सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत (do you the Types of Paithani Saree watch this viral video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये साड्यांच्या फोटोसह पैठणी साड्यांचे प्रकार सांगितले आहे.

१. कलांजली पैठणी

२. चंद्रकोर पैठणी

३. येवला पैठणी

४. मुनिया पैठणी

५. महाराणी पैठणी

६. ब्रॉकेट पैठणी

७. कांजीवरम पैठणी

या सर्व पैठणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या पैठणी साड्यांपैकी तुमच्याकडे एक तरी पैठणी असेल.

हेही वाचा : चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…

पाहा व्हायरल व्हिडीओ (viral video)

drx_kishorikhatake या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पैठणी साडीचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चंद्रकोर सोडून माझ्या कडे सगळ्या प्रकारच्या पैठणी आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “गंधर्व पण पैठणी असते” अनेक युजर्सनी त्यांच्याकडे कोणती पैठणी आहे, याविषयी लिहिलेय. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हॉर्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : ‘म्हणून कोणाला हलक्यात घेऊ नका..’, खेकड्याबरोबर मस्ती करणं मांजरीला पडलं महागात; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकजवळ असलेलं येवला हे पैठणीचं माहेरघर आहे. मात्र पैठणच्या पैठणीत आणि येवल्याच्या पैठणीत काहीही फरक नाही. येवल्यातल्या पैठणीत हातमागावर साडी म्हणजेच पैठणी तयार करणारे कारखानदार मोठ्या प्रमाणावर आहेत. तर पैठणमध्ये सरकारी युनिट आहे.
हल्ली सेमी पैठणी साडीला खूप मागणी आहे. ही साडी हातमागावर नाही तर मशीनवर तयार केली जाते. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता सेमी पैठणी अस्तित्वात आली. महाराष्ट्रासह इतर राज्यात सेमी पैठणी तयार केली जाते.