आपल्याकडे मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती सतत मोबाइल हाताळताना दिसतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि बेडरूमपासून ते शौचालयापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो. मोबाइलचा वाढता वापर अतिशय घातक असून, त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर काय होतो याचा विचारही केला जात नाही. टाइमपाससाठी शौचालयात मोबाइल नेहून त्याचा वापर केला जातो. पण हा टाइमपास तुम्हाला खूप आजारी पाडू शकतो……
डॉक्टरांनी नुकत्याच केलेल्या निरिक्षणांनुसार, शौचालयात मोबाइलचा वापर करणाऱ्यांना मुळव्याध होण्याची शक्यता दाट जास्त आहे. शौचालयामध्ये मोबाइल नेल्याने बॅक्टरीया तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला लागतात व तेच तुमच्या हातालाही लागतात. परिणामी तुम्हाला मुळव्याधासारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं.
ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्व्हेनुसार, ५७ टक्के लोक शौचालयात मोबाइलचा वापर करतात. तर यातील ८ टक्के लोक हे नियमितपणे शौचालयात बसून मोबाइलचा वापर करतात. शौचालयात मोबाइल वापरणाऱ्यांना मुळव्याधासारख्या अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याचे डॉक्टारांच्या निदर्शनास आले आहे.
ब्रिटेनमधील प्रसिद्ध डॉक्टर साराह जर्विस यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेय की, शौचालयात जास्तवेळ बसल्यामुले नसा ताणल्या जातात. परिणामी मुळव्याध होण्याची संभावना अधिक आहे. जितक्यावेळ तूम्ही मोबाइलचा वापर कराल तितक्यावेळ तुम्हाला कमोडवर बसावं लागेल. त्यामुळे गुद्दमार्गाच्या मांसपेशी ताणल्या जातात परिणामी मुळव्याधचा धोका वाढतो.
शौचालयात मोबाईल नेल्याने बॅक्टरीया तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला लागतात व तेच तुमच्या हातालाही लागतात. फोनवर बोलल्याने मोबाईलवर चिकटलेले बॅक्टरीया श्वसनमार्गात प्रवेश करतात. त्यामुळे फ्लू, फंगल इन्फेकशन यासारखे आनेक गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते.
मूळव्याधाची लक्षणे –
शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे
शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे
शौचाच्या ठिकाणी खाज येणे
शौचाच्या वेळेला मांसत भाग बाहेर येणे
मूळव्याधाचे उपाय…
आहारात फायबरचं प्रमाण वाढवा, पाणी जास्तीत जास्त सेवन करा, रोज नियमित एक्सरसाइज करा. तसेच टॉयलेटला जाताना फोन बाहेरच ठेवा. शौचालयात फोनचा वापर करू नये.