गुगल आज भारतीय सेल बायोलॉजिस्ट डॉ कमल रणदिवे यांचा १०४ वा वाढदिवस डूडलद्वारे साजरा करत आहे. डॉ. रणदिवे या कर्करोगावरील संशोधनासाठी आणि विज्ञान शिक्षणाद्वारे अधिक न्याय समाज निर्माण करण्यासाठी ओळखल्या जातात. आजचे डूडल भारतातील पाहुणे कलाकार इब्राहिम रायंतकथ यांनी तयार केले आहे. आजच्या डूडलसाठी त्यांच्या प्रेरणांबद्दल बोलताना, रायंतकथ यांनी सांगितले की, “माझ्या प्रेरणाचा मुख्य स्त्रोत २० व्या शतकातील प्रयोगशाळेतील सौंदर्यशास्त्र आणि कुष्ठरोग आणि कर्करोगाशी संबंधित पेशींचे सूक्ष्म जग आहे.” रायंतकथ यांच्या द्वारे काढलेल्या या डूडलमध्ये डॉ रणदिवे या मायक्रोस्कोप बघत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमल समर्थ ज्यांना डॉ. कमल रणदिवे या नावाने ओळखले जाते, त्यांचा जन्म १९१७ मध्ये पुण्यात झाला होता. तसेच डॉ. कमल रणदिवे यांच्या वडिलांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रेरित केले. कमल यांचे वडील दिनकर हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्राचे प्राध्यापक होते. घरातील सर्व मुलांना, विशेषतः मुलींना उत्तम शिक्षण मिळावे हा त्यांचा उद्देश होता.

कमल यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्येच बायोलॉजीसाठी बीएससी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी जयसिंग रणदिवे यांच्याशी लग्न केले जे व्यवसायाने गणितज्ञ होते ज्यांनी त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी खूप मदत केली.

डॉ. कमल रणदिवे या त्यांच्या वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे जगला. आयुष्यातील प्रत्येक परीक्षा त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या. डॉ. कमल रणदिवे या नेहमी काहीतरी नवीन शिकत असे आणि त्यात चांगले काम करायचे. त्या इंडियन असोसिएशन ऑफ वुमन सायंटिस्ट्स (IWSA) च्या प्रमुख संस्थापक सदस्या होत्या. डॉ. कमल जयसिंग रणदिवे यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. कमल रणदिवे यांनी सुरुवातीच्या काळात कर्करोगावर अनेक संशोधन केले. खरं तर, स्तनाचा कर्करोग आणि आनुवंशिकता यांच्यातील दुवा मांडणार्‍या त्या पहिल्या महिल्या होत्या. नंतर अनेक संशोधकांनीही याची पुष्टी केली. तसेच इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (ICRC) मध्ये संशोधक म्हणून काम करत असताना १९४९ मध्ये त्यांनी पेशीविज्ञान, पेशींचा अभ्यास या विषयात डॉक्टरेट मिळवली. बाल्टिमोर, मेरीलँड, यूएसए येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील फेलोशिपनंतर, त्या मुंबई आणि ICRC येथे परतल्यानंतर त्यांनी तिथे देशातील पहिली टिश्यू कल्चर लॅबची स्थापना केली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr who was kamal ranadive find out why google has created their doodle today scsm
First published on: 08-11-2021 at 15:55 IST