Kidney Stone Home Remedy: मूत्रपिंडात तयार होणाऱ्या गाठी म्हणजे केवळ एक आजार नाही, तर शरीराला सतत त्रास देणारा शापच. काही वेळा या गाठी इतक्या घट्ट बनतात की, मूत्रविसर्जन करणेही अवघड होतं. दीर्घकाळ गाठी राहिल्यास त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवरही गंभीर होऊ शकतो.
डॉक्टर नेहमीच जास्त पाणी पिण्याचा आणि काही औषधं घेण्याचा सल्ला देतात; पण या वेदनेचं कायमचं समाधान जर एका साध्या घरगुती रसामध्ये लपलेलं असेल, तर? होय, कर्मा आयुर्वेदचे संस्थापक डॉ. पुनित धवन यांच्या मते, काही नैसर्गिक रस नियमित घेतल्यास मूत्रपिंडातील गाठी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा औषधं यांशिवाय नैसर्गिकरीत्या बाहेर पडू शकतात. चला तर जाणून घेऊया, कोणते आहेत हे चार रस, जे शरीरातील घाण आणि गाठी दोन्ही दूर करतात.
१. लिंबाचा रस
आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन यांनुसार, लिंबामधील सायट्रिक आम्ल (Citric Acid) हे घटक शरीरातील कॅल्शियमशी जोडून गाठी बनू देत नाही. लिंबाचा रस गाठींचे सूक्ष्म तुकडे करून, त्यांना मूत्रावाटे बाहेर टाकतो. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घेणं ही सवय मूत्रनलिकेतील घाण काढून टाकते आणि संसर्ग टाळते. त्याशिवाय लिंबातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि शरीर ताजेतवाने ठेवते.
२. तुळशीचा रस
तुळशीच्या पानांत असणारं अॅसिटिक आम्ल गाठी विरघळवण्यात आणि मूत्रपिंडातील ताण कमी करण्यात अत्यंत उपयोगी आहे. डॉ. धवन सांगतात की, तुळशीचा रस शरीरातील सूज कमी करतो, पचनसंस्थेचं कार्य सुधारतो व मूत्रनलिकेतील सूक्ष्मजंतूंना नष्ट करतो. दररोज सकाळी तुळशीच्या काही ताज्या पानांचा रस मधासह घेतल्यास काही दिवसांतच आराम मिळतो आणि मूत्रपिंड अधिक स्वच्छ राहते.
३. डाळिंबाचा रस
डाळिंब केवळ रक्तशुद्धीकारक नाही, तर मूत्रपिंडाचं कार्य सुरळीत ठेवणारं उत्कृष्ट फळ आहे. या रसातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात आणि मूत्रातील आम्लता कमी करतात. दररोज एक ग्लास ताज्या डाळिंबाचा रस घेतल्यास गाठी वाढण्याची शक्यता कमी होते आणि मूत्रवहन प्रणाली अधिक सक्रिय राहते.
४. गव्हांकुराचा रस (व्हीट ग्रास)
गव्हांकुर म्हणजे निसर्गाचा अमृतसर. या रसात प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे मुबलक प्रमाणात असतात. संशोधनानुसार, गव्हांकुराचा रस मूत्रनलिकेतील गाठी विरघळवतो आणि मूत्रमार्ग स्वच्छ ठेवतो. दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास गव्हांकुराचा रस घेतल्यास शरीरातील घाण सहज बाहेर पडते आणि मूत्रपिंडाचे आतून शुद्धीकरण होते.
डॉक्टरांचा सल्ला :
हे उपाय नैसर्गिक आणि प्रभावी असले तरी प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. म्हणून हे उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
फक्त औषधांतच नव्हे, तर निसर्गातही आहे मूत्रपिंडातील गाठींचं समाधान. दररोज लिंबू, तुळस, डाळिंब व गव्हांकुर या चार रसांचा वापर केल्यास गाठी विरघळतात, मूत्रमार्ग स्वच्छ होतो आणि शरीर निरोगी राहतं. एक छोटा नैसर्गिक उपाय; पण देऊ शकतो मोठा दिलासा.
