लठ्ठपणा कमी करण्यासाठी, शरीरातील अनावश्यक वजन कमी करण्यासाठी खाण्यावर संतुलन असणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच नेहमी व्यायाम, जॉगिंग करणं देखील महत्त्वाचं आहे. यासह दररोज पाणी पिण्याची सवय लावून घेतली पाहिजे. पाणी पिण्याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ती फायदेशीर गोष्ट म्हणजे लिंबू पाणी पिणे. लिंबू पाण्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे हे पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत.

लिंबू हे व्हिटामिन सीचं स्रोत मानलं जातं. यात थियामिन, रिबोफ्लोविन, नियासिन, व्हिटामिन बी-६, फोलेट आणि व्हिटामिन- ई असतं. लिंबू पाणी प्यायल्यानं शरीरातील मेटाबॉलिजम वाढतं. ज्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि त्यासाठीच तज्ज्ञ दररोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात.

कशी असेल प्रक्रिया?

१. लिंबू पाण्याबरोबर तुम्ही गूळ मिक्स करून पाणी पिऊ शकता. यासाठी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. त्यानंतर या पाण्यात गूळ मिक्स करा आणि साधारण दहा मिनिटे उकळू द्या. त्यानंतर शेवटी यामध्ये लिंबू मिक्स करून प्या. हे आपल्या शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे पाणी तुम्ही सतत आठ दिवस घेतले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

२. ३ चमचे बडीशेप, २ चमचे जिरे, ४ चमचे गुळाची पावडर, ३ चमचे ग्रीन टी, १ चमचा मध, २ चमचे आल्याची पावडर, ३ चमचे दालचिनी आणि १ चमचे लिंबाचा रस घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर हे साहित्य तीन ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारण तीस मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवा. त्यानंतर शेवटी यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

३. सकाळी उठल्यावर दोन ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्या. याने वजन कमी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टिप्स: वरील टिप्सचा वापर करताना एकदा डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या.)