Drinking Water Immediately After Urination Effects : पाणी हा आपल्या शरीराचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. शरीराचा सुमारे ६०-७०% भाग पाण्याने बनलेला आहे. ते केवळ शरीराला हायड्रेटच ठेवत नाही, तर प्रत्येक पेशी आणि अवयवाचे योग्य कार्य करण्यासदेखील मदत करते. पाणी शरीरातील विषाक्त पदार्थ व घाण बाहेर काढते आणि पचन सुधारते. पाण्याचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि मूत्रपिंडे निरोगी राहतात. शरीराला हायड्रेट ठेवून तुम्ही त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवू शकता. पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा, डोकेदुखी व एकाग्रतेचा अभाव येतो. पाणी हे आरोग्यासाठी अमृत आहे; पण जर तुम्ही ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी सेवन केले, तर ते शरीरासाठी अमृत ठरेल; अन्यथा ते विषासमान काम करील.

बऱ्याचदा लोकांना आधी लघवी करण्याची आणि नंतर पाणी पिण्याची सवय असते. लघवी केल्यानंतर पाणी प्यायल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो ते तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी आणि युनानी पद्धतींमध्ये पिण्याच्या पाण्याबद्दल वेगवेगळे विचार आहेत.

युनानी पद्धतीबद्दल बोलताना, निसर्गोपचार तज्ज्ञ व हकीम डॉ. रियास अब्बास झैदी म्हणाले की, जर तुम्ही लघवी करण्यापूर्वी पाणी प्यायलात, तर त्या पाण्याचा तुमच्या शरीराला उपयोग् होईल; परंतु जर तुम्ही लघवी केल्यानंतर पाणी प्यायलात, तर तर ताचा तुमच्या शरीरावर विषासमान परिणाम होईल. लघवी केल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी कसे हानिकारक आहे आणि विषासारखे कसे काम करते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

लघवी केल्यानंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य?

लघवी केल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा ते थेट मूत्रपिंडांपर्यंत पोहोचते आणि मूत्रपिंडे त्या पाण्याचे शुद्धीकरण करतात आणि मूत्राद्वारे त्यातील विषाक्त पदार्थ बाहेर काढून टाकतात. हे शरीरासाठी उपयुक्त ठरते; पण नंतर ते विषासारखे सिद्ध होते. जर तुम्ही लघवी करण्यापूर्वी पाणी प्यायले, तर मूत्रपिंडांना आधीच ते स्वच्छ होण्याचे संकेत मिळतात आणि मूत्रपिंडे शरीरातील विषाक्त पदार्थ सहजतेने बाहेर काढून टाकू शकतात. पण, जर तुम्ही लघवी केल्यानंतर पाणी प्यायलात, तर तुम्ही मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव टाकता आणि तुमच्या मूत्रपिंडांना सातत्याने काम करीत राहावे लागते. लघवीनंतर पाणी प्यायल्याने पोटावर दबाव येतो, पोटात पेटके येऊ शकतात आणि तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागू शकते. तुम्हाला माहीत आहे का की, लघवी केल्यानंतर पाणी प्याल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोकादेखील वाढू शकतो?

जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही, त्यात काही अवशेष राहतात. लघवीनंतर लगेच पाणी प्यायल्यास, हे अवशेष मूत्राशयाच्या भिंतींना चिकटू शकतात आणि योग्यरीत्या बाहेर येऊ शकत नाहीत. जर हे बराच काळ चालू राहिले, तर त्यामध्ये स्फटिकसदृश खडे तयार होऊ लागतात, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका आणखी वाढू शकतो. त्यामुळे लघवी केल्यानंतर १५ मिनिटे तरी पाणी पिऊ नका.

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांनी सांगितले की, जर तुम्हाला तुमची मूत्रसंस्था निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही लघवी करण्यापूर्वी पाणी प्यावे. तुम्ही दिवसभर पाणी पिऊ शकता; पण ते लघवी करण्यापूर्वी प्या. जर तुम्ही लघवी केल्यानंतर लगेच पाणी प्यायलात, तर ते तुमच्या आरोग्यासाठी वाईट ठरेल. त्यामुळे लघवी केल्यानंतर १५ मिनिटानंतरच पाणी प्या.