महान अर्थतज्ञ आचार्य चाणक्यजी यांनी नीति शास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. चाणक्यजींनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो त्याच्या जीवनात मोठी प्रगती होते.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात व्यक्तीला अपमानित करणाऱ्या काही विषयांचा उल्लेख केला आहे. जी कधी कधी माणसाला त्यांच्या आयुष्यात अपमानित करते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात…

अज्ञानामुळे व्हावे लागते अपमानित

अज्ञानामुळे मनुष्याला आयुष्यात अनेकदा अपमानाला सामोरे जावे लागते. जर एखादी व्यक्ती अज्ञानी आणि मूर्ख असेल तर लोकं त्यांच्याकडे चांगले पाहत नाहीत. त्याच बरोबर कोणालाही त्यांचाशी बोलायला आवडत नाही आणि कोणी त्याचा आदर करत नाही.त्याच्या मूर्खपणामुळे अनेक वेळा अज्ञानी लोकं असे काही करतात, त्यामुळे त्याला सर्वांसमोर अपमानित व्हावे लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे

आचार्य चाणक्यजी मानतात की तरुणपणात माणसाच्या आत जास्त उत्साह असतो आणि अनेक परिस्थितींमध्ये तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. चाणक्य जी मानतात की क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच वेळी, रागाच्या भरात, एखादी व्यक्ती कधीकधी चुकीची कामे करते आणि तो चुकीच्या मार्गावर भटकतो. त्यामुळे त्यांना समाजात मान-प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे तारुण्यात व्यक्तीने आपली ऊर्जा आणि उत्साह योग्य दिशेने लावावी आणि आपल्या रागाने कोणाचेही नुकसान करू नये.

इतरांवर अवलंबून राहू नये

चाणक्य जी मानतात की जो माणूस दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याला आयुष्यात प्रत्येक वेळी अपमान सहन करावा लागतो. कारण तो स्वतः काही करू शकत नाही. प्रत्येक कामात त्याला इतरांची मदत घ्यावी लागते आणि तो निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे समाजात अशा लोकांना अनेक वेळा अपमानित व्हावे लागते.