अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते. इलेक्ट्रॉनिक सिगारेट, ज्याला सामान्यतः ई-सिगारेट देखील म्हटले जाते, विशेषत: तरुणांमध्ये, त्याचा छंद खूप वाढला आहे, परंतु हे व्यसन त्यांचे आंतरिक नुकसान करते. २०१९ मध्ये भारत सरकारने या वस्तूचे उत्पादन, आयात, निर्यात, वितरण, साठवण आणि जाहिरातीवर पूर्णपणे बंदी घातली होती, त्याला ई-सिगारेट प्रतिबंध कायदा २०१९ असे म्हणतात. मात्र, असे असूनही, त्याचा पुरवठा आणि वापर आजही भारतात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ई-सिगारेट म्हणजे नेमकं काय?

ई-सिगारेट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे बॅटरीवर चालणारे छोटे उपकरण आहे. श्वास आत घेताना या यंत्राद्वारे निकोटीनसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. यामध्ये वापरले जाणारे द्रव आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. ई-सिगारेटमधून राख तयार होत नाही. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. सिगारेट ओढताना जळणाऱ्या खऱ्या सिगारेटप्रमाणे तो लाइट प्रकाशमान होतो. खऱ्या सिगारेटसारखा धूर येत असल्याने सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ई-सिगारेटचा पर्याय दिला जातो. ई-सिगारेटमुळे दातांवर काळे पडत नाही. ई-सिगारेटचा आकार व बाह्यस्वरूप अत्यंत आकर्षक असते. अनेकदा हा आकार खऱ्या सिगारेटसारखा केला जातो. त्यामुळे तरुणाई याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असते.

आणखी वाचा : तुम्ही देखील तुमच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी चे सेवन करताय? यामुळे शरीरावर होणारे ४ दुष्परिणाम जाणून घ्या

ई-सिगारेट शरीरासाठी अतिशय नुकसानदायक  

  • तंबाखू सेवनाने होणारे आजारच ‘ई-सिगारेट’मुळे होतात. कॅन्सर, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, फुफ्फुसाचे आजार (सीओपीडी), दमा, अस्थमा, किडनी खराब होणे, अॅसेडिटी, आतड्यांचे आजार, कॅन्सर आदी आजार ‘ई-सिगारेट’मुळे होऊ शकतात.
  • ई-सिगारेट पिणारे आणि आजूबाजूचे लोक दोघांचेही नुकसान करतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
  • ई-सिगारेटमध्ये कार्सिनोजेनिक घटक आढळतात, जे मानवांसाठी कोणत्याही ‘विषारा’ पेक्षा कमी नाहीत, जगभरातील शास्त्रज्ञांनी ते न पिण्याचा सल्ला दिला आहे.
  • ई-सिगारेटमध्ये निकोटीन असते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो आणि जर कोणी त्याचा सतत वापर करत असेल तर त्याचे वाईट व्यसनात रूपांतर होते.
  • ई-सिगारेट पिण्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसावर होतो आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E cigarettes are dangerous to your health pdb
First published on: 07-10-2022 at 11:46 IST