चिकन किंवा मटण हे प्रथिनांचे भांडार आहेत. संपूर्ण जगात, लोक त्यांच्या आहारात प्रथिनांसाठी चिकनचा सर्वाधिक समावेश करतात. बऱ्याच जणांना चिकन मोठ्या प्रमाणात आवडतं. जरी निरोगी आणि चवदार चिकन हे लाखो बॅक्टेरियांची संक्रमित असते. तुम्ही विकत आणलेलं चिकन ताजं आहे की नाही हे ओळखणं अनेकदा कठीण असतं. बाजारात आणलं की ते समोरच कापलेलं असतं. त्यामुळे तसं काही चिंता करण्याचं कारण नसतं. पण ऑनलाईन किंवा शॉपिंग मॉलमधून घेतलं की कठीण होतं. चला जाणून घेऊयात ताजं चिकन कसं ओळखायचं..
चिकनचा रंग : तुम्ही जेव्हा ताजं चिकन विकत घेता तेव्हा त्याचा रंग फिकट गुलाबी असतो. पण जेव्हा चिकन खराब होतं तेव्हा त्याचा रंग फिका पडतो, पिवळसर दिसू लागतं. जर एकदमच राखाडी पडलं असेल तर ते गरजेपेक्षा जास्त खराब असल्याचं समजून जा.
चिकनचा वास : सर्वात पहिलं म्हणजे चिकनचा वास घेऊन पाहा, त्याच्यातून विचित्र वास येत असेल ते खराब झालेलं असतं. फ्रेश चिकनचा वास सौम्य असतो. खराब चिकनमध्ये तीव्र, आंबट, सडल्यासारखा वास येतो.
चिकनचा चिकटपणा : चिकनला स्पर्श केल्यानंतर खूपच चिकटपणा जाणवत असेल तर समजून जा चिकन खराब आहे. चिकन धुतल्यानंतरही चिकटपणा कायम राहत असेल तर याचा अर्थ चिकन खूपच खराब आहे.
चिकनची चव : ताज्या आणि गोठवलेल्या चिकनची चव खूपच वेगळी असते. त्यामुळे तुम्ही चिकन खात असाल तर तुम्हाली ही बाब लक्षात येईल. तर तुम्हाला खाताना तसं काही जाणवलं तर ते चिकन खाऊ नका.
चिकन शिजवल्यानंतर कशा प्रकारे स्टोर करावे
शिजवलेले चिकन देखील हवाबंद डब्यात रेफ्रिजरेट केले पाहिजे. जर तुम्हाला कच्चे चिकन जास्त काळ साठवायचे असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. मटणाच्या बाबतीतही हाच नियम आहे.
खराब झालेले चिकन खाल्ल्याने होणारे आजार
जर चिकन जास्त तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर यात बॅक्टेरियाचा विकास वाढतो. यामुळे हे अन्न खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. खराब झालेल्या चिकनमध्ये विष तयार होते, जे शिजवल्यानंतरही निघत नाही. यामुळे थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या, अतिसार, रक्तरंजित मल आणि निर्जलीकरण होऊ शकते. अशावेळी तुम्हाला रुग्णालयात उपचार करण्याची वेळ येऊ शकते.
हेही वाचा >> तुम्ही रोज सकाळी अक्रोड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
फ्रीजमधील चिकन खराब झाले आहे हे कसे समजावे?
फ्रिजमध्ये चिकन जास्त वेळ ठेवल्यास चिकन खराब होईल. ते कसे ओळखायचे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
रंग बदलणे – फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन तांबड्या आणि हिरवे झाले तर समजून घ्या की चिकन खराब झाले आहे. यावेळी हे चिकन भरपूर जिवाणूंनी दूषित झालेले असते.
दुर्गंधी- फ्रिजमध्ये ठेवलेल्या चिकनला दुर्गंधी येऊ लागली तर समजा चिकन कुजले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत खाऊ नये. चिकन शिजल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवले तरी त्याला अमोनियासारखा वास येत असेल तर ते खराब झाले आहे.
रेक्श्चर – खराब झालेल्या चिकनचे रेक्श्चरही बदलते. अशा स्थितीत चिकन धुवून देखील यातील बॅक्टेरिया निघत नाहीत. तसेच ज्या भांड्यात तुम्ही चिकन धुवत आहात तेही दूषित होईल.