Best Fruit for Fatty Liver Cure: एक नैसर्गिक फळ, जे फक्त काही आठवड्यांसाठी बाजारात येतं… पण त्याचा प्रभाव वर्षभर तुमच्यावर राहतो. डॉक्टर आणि आयुर्वेदिकतज्ज्ञ याचं नाव घेताच म्हणतात, “हे खाल्लं नाही, तर तुमचं शरीर खूप काही गमावेल!” जाणून घ्या या गुप्त फळाचं संपूर्ण आरोग्यदायी रहस्य…

एका फळामुळे तुमचं संपूर्ण आरोग्य वर्षभर राखलं जाईल असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? हो, ही केवळ मोठी थाप नाही, तर शास्त्रीय आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेली बाब आहे. विशेष म्हणजे हे फळ बाजारात अगदी फक्त दोन महिनेच उपलब्ध असतं. पण, जर तुम्ही हे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्लं, तर तुमचा मेंदू तेजस्वी, लिव्हर पूर्णपणे फिट आणि शरीर पूर्ण वर्षभर ऊर्जावान राहू शकतं.

ह्या फळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, आयर्न यांसारखी आवश्यक पोषकतत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. पण, जे या फळाला खास बनवतं, ते म्हणजे त्यामधील अँथोसायनिन्स जे आपल्या शरीरात होणाऱ्या फ्री रेडिकल डॅमेजला रोखतात आणि वाढत्या वयावर ब्रेक लावतात.

आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांच्या मते, हे फळ शरीराला शीतलता देतं, उष्णता कमी करतं आणि पचनक्रिया सुधारतं. याच्या फळांशिवाय पानं आणि बियांचाही औषधी उपयोग आहे. विशेषतः डायबेटिस रुग्णांसाठी हे अमृतसमान मानलं जातं. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि इन्सुलिनचं उत्पादन वाढतं.

या फळाच्या नियमित सेवनाने तुमचा लिव्हर डिटॉक्स होतो. लिव्हरमध्ये जमा विषारी घटक बाहेर फेकले जातात, सूज कमी होते आणि फॅटी लिव्हरसारख्या आजारांपासून संरक्षण मिळतं. हे फळ नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजवरही प्रभावी असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे.

मग हे फळ नक्की कोणतं?

सध्या बाजारात दिसणारं एक गडद जांभळसर फळ… जे अनेकांच्या नजरेआड जातं, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते असतं अमूल्य. अनेक गुणधर्मांनी भरलेलं आणि शरीराला ऊर्जा देणारं हे फळ म्हणजे – जांभूळ. फक्त २००-२५० ग्रॅम जांभूळ दररोज खाल्ल्यास हे फायदे मिळू शकतात. यात लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. जांभूळ हे फक्त फळच नाही तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप फायदेशीर आहेत. मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर मानले जाते. मात्र ज्यांना सर्दी, सायनसचा त्रास आहे त्यांनी हे टाळावं आणि लक्षात ठेवा – जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी किंवा दूध पिणं टाळा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.