Home Remedy for Heart and Liver: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार आणि ताण हे आपल्याला नकळत आजारी बनवत आहेत. जेवणात जंक फूड, तळलेले पदार्थ व अनियमित सवयी यांमुळे शरीर दिवसेंदिवस कमकुवत होतंय. परिणामी, कमी वयातच डायबेटीस, हार्ट ब्लॉकेज, लिव्हरचे विकार आणि मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या वाढत आहेत. पण, जर तुम्ही रोजच्या आहारात एक साधा देशी पदार्थ समाविष्ट केला, तर तुम्ही सर्व या आजारांपासून लांब राहू शकता आणि तो पदार्थ तुम्हाला तुमच्या दररोजच्या स्वयंपाकघरात सहज सापडेल.

हृदयाच्या आरोग्याचं रहस्य लपलंय आपल्या घरात

नवी दिल्लीतील एम्सचे माजी कन्सल्टंट व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक डॉ. बिमल झांजेर सांगतात “आपल्या किचनमध्येच हृदयासाठी सर्वोत्तम औषध लपलेलं असतं.” ते म्हणतात, “हा पदार्थ रोज घेतल्यानं रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, धमनींमधील अडथळे (ब्लॉकेज) हळूहळू कमी होतात आणि रक्तदाब स्थिर राहतो.” काही संशोधनांतूनही हे सिद्ध झाले आहे की, हा घटक LDL (वाईट कोलेस्ट्रॉल)चे ऑक्सिडेशन थांबवतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात घटतो.

लिव्हरला मिळतो नवा जोम!

आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव यकृत आणि तो शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्याचं काम करतो. हा देशी पदार्थ यकृतामधील एन्झाइम्सना सक्रिय करतो आणि शरीरातील विषारी घटक स्वच्छ करण्यात मदत करतो. त्यात असलेलं सेलेनियम नावाचं तत्त्व यकृताचं संरक्षण करतं आणि यकृताचं होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करतं.

मूत्रपिंडाला मिळते सुरक्षा कवच!

तज्ज्ञांच्या मते, या पदार्थात आढळणारं अ‍ॅलिसिन (Allicin) नावाचं संयुग मूत्रपिंडांना निरोगी ठेवतं.
हे घटक किडनीच्या ऊतींना बळकट करतात आणि रक्तातील विषारी घटक फिल्टर करण्याची प्रक्रिया सुधारतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास मूत्रपिंडाला सूज, संसर्ग आणि मूतखडे होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

पचनसंस्थेसाठीही वरदान!

हा पदार्थ फक्त हृदय किंवा यकृतासाठी नाही, तर पोटाच्या तक्रारींसाठीही औषध ठरतो. त्यामुळे आतड्यांमधील जळजळ कमी होते, गॅस व अपचन दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.

शेवटी, रहस्य उघड होतंय…

आता तुम्हाला वाटत असेल अखेर हा ‘चमत्कारिक देशी पदार्थ कोणता?
तर उत्तर अगदी तुमच्या स्वयंपाकघरातल्या मसाल्यांच्या डब्यात आहे तो म्हणजे लसूण!

डॉ. बिमल झांजेर सांगतात, “लसूण हे निसर्गानं दिलेला अमृततुल्य वरदान आहे. एकाच लसणीच्या पाकळीत हृदय, लिव्हर व किडनीला बळ देणारे सर्व घटक साठलेले आहेत.”

म्हणूनच लक्षात ठेवा- दररोज सकाळी एक कच्ची लसणाची पाकळी घेतली, तर औषधाची गरज भासणार नाही. स्वयंपाकघरातली ही साधी गोष्टच तुमचे आरोग्य आयुष्यभर टिकवून ठेवू शकते.