scorecardresearch

कोरफडीच्या अती सेवनाने शरीरावर होऊ शकतो वाईट परिणाम? जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी!

कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफडीचे अनेक चांगले फायदे शरीराला होत असतात. मात्र कोरफडीच्या अती सेवनाने आपल्या शरीराला दुष्परिणाम देखील होऊ शकतो.

lifestyle
तुम्ही अनेक दिवस कोरफडचे सेवन करत असाल तर त्याचा तुमच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो. (credit: pixabay)

तुम्ही आत्तापर्यंत कोरफडीच्या अनेक फायद्यांबद्दल ऐकलं असेल. पण कोरफडीच्या अती सेवनाने देखील आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. अनेक लोक अनेक वर्षांपासून त्याचा वापर शारीरिक स्वास्थ्य जपून ठेवण्यासाठी करत आले आहेत. कोरफड ही आपल्याला फायद्याबरोबरच नुकसान देखील पोहोचवू शकते असं वेबएमडीच्या अहवालनुसार सांगण्यात आलं आहे. कोरफड मध्ये असे काही लैक्सेटिव (रेचक) घटक आहेत जे शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. जेव्हा आपण कोरफडीचा ज्यूस किंवा गर यांचं सेवन करतो तेव्हा कोरफडीच्या आतील गरात अढळणारे लैक्सेटिव घटक शरीरात अनेक समस्या निर्माण करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोरफडीच्या अती सेवनाने शरीराला कोणते वाईट परिणाम होतात.

१. डीहायड्रेशनची समस्या

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफड ज्यूस किंवा गर घेत असाल तर ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. कारण कोरफडीच्या अति सेवनाने शरीरात डीहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

२. अशक्तपणा जाणवणे

कोरफडीचा ज्यूस तुम्ही सतत सेवन केलात तर शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात व अशक्तपणा जाणवू शकतो. त्यात तुम्हाला हृदयासंबंधित काही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्या घेतल्यानंतरच कोरफड ज्यूसचे सेवन करावे.

3. स्किन एलर्जी समस्‍या

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी काहीजण कोरफडच्या आतील गरांचा वापर करतात. या गरांचा वापर करताना त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे आणि लालसरपणा येणे अशा समस्या जाणवत असतील तर त्वरित कोरफड गरांचा वापर करणे थांबवा.

४. आतड्यांमध्ये जळजळ जाणवणे

कफ झाल्यावर अनेकजण कोरफडचा रस पिण्याचा सल्ला देतात. मात्र पचनसंबंधित काही समस्या असल्यास तेव्हा कोरफड रसचे सेवन करू नका. कारण या रसात लैक्सेटिव घटक असल्याने आतड्यांमध्ये जळजळ होणे, ओटीपोटी दुखणे, अतिसार आणि लूज मोशन अशा समस्या उद्भवू शकतात.

५. रक्तातील साखरेवर होऊ शकतो परिणाम

तुम्ही जर बराच काळ कोरफडचं सेवन करत असाल तर याचा परिणाम तुमच्या रक्तातील साखरेवर परिणाम करून तुमचे बीपी कमी होऊ शकतो.

६. गरोदरपणात कोरफडीचे सेवन करणे टाळा

गर्भवती महिलांनी कोरफडीचे सेवन अजिबात करू नये. कोरफडीमध्ये असलेले लैक्सेटिव घटकामुळे गर्भाशय आकुंचन होऊ शकते. यामुळे बाळाच्या जन्मावेळी अनेक समस्या उद्भवू शकतात. तर यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-07-2021 at 18:38 IST
ताज्या बातम्या