या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Eye Care Tips: सध्याच्या युगात मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर जास्त केला जातोय. प्रत्येक कामासाठी मोबाईल लॅपटॉप यांची गरज भासतेच. तसंच प्रत्येक नोकरीच्या ठिकाणीही लॅपटॉपची आवश्यकता असते. मात्र, यांचा सततचा वापर डोळ्यांना त्रास देऊ शकतो. लॅपटॉप, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांना मोठे नुकसान होते. याचे कारण असे की लॅपटॉप आणि मोबाईल मधून ब्लू रेज बाहेर पडतात. जे आपल्या त्वचा आणि डोळे या दोघांसाठी हानिकारक असतात. यामुळे डोळे थकल्यासारखे दिसू लागतात आणि त्वचेवर मुरुम, अकाली सुरकुत्या अशा सर्व प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर टाळला पाहिजे. मात्र, कामाच्या ठिकाणी लॅपटॉप हा वापरावा लागतोच. त्यामुळे अशावेळी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

१) चहाच्या पिशव्या कामी येतील

डोळ्यांना आराम देण्यासाठी दोन चहाच्या पिशव्या एका मग उकळलेल्या पाण्यात २ ते ४ मिनिटे ठेवा. नंतर चहाच्या पिशव्या बाहेर काढून, पिशव्यांमधील अतिरिक्त पाणी काढून टाका. चहाच्या पिशव्या खोलीच्या तापमानावर हळू हळू थंड होऊ द्या किंवा रेफ्रिजरेटरमध्ये १० मिनिटे थंड करा. त्यानंतर १५ मिनिटे बंद डोळ्यांवर बॅग ठेवा. त्यानंतर काही वेळ विश्रांती घ्या. तुम्हाला नक्की आराम मिळेल.

२) डोळे धुवा

दिवसभरात किमान ५ ते ६ वेळा थंड पाण्याने डोळे धुण्याचा प्रयत्न करा. तसंच रात्री झोपण्यापूर्वी, एक कापसाचा बोळा घ्या आणि तो थंड पाण्यात भिजवा. आता हा ओला कापूस काही वेळ डोळ्यांवर ठेवून विश्रांती घ्या. याने तुमच्या डोळ्यांना जाणवणारा थकवा निघून जाईल.

(हे ही वाचा: मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदलून पाहा…)

३) काकडी थंडावा देईल

थकलेल्या डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी तुम्ही काकडीचाही वापर करू शकता. यासाठी एक काकडी घ्या आणि नंतर कापून घ्या. काकडी थंड असल्याची खात्री करा. आता थंड पाण्याने डोळे धुवा आणि नंतर काकडीचे काप डोळ्यांवर काही वेळ ठेवा. याने डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे देखील निघून जातील.

४) गुलाबपाणी चालेल

दिवसभर लॅपटॉपवर काम केल्यानंतर डोळ्यात जळजळ किंवा खाज येऊ शकते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता. यासाठी कापसाचा गोळा घेऊन त्यावर गुलाबपाणी टाकून काही वेळ डोळ्यांवर ठेवा.

( हे ही वाचा : वजन कमी करण्यासाठी काकडी आहे उपयुक्त; जाणून घ्या केव्हा आणि कसे खावे)

या गोष्टी लक्षात ठेवा

1) हायड्रेटेड रहा

डोळ्यांसोबतच शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी आवश्यक आहे. जर तुम्ही पुरेसे हायड्रेटेड असाल, तर तुम्ही तुमचे डोळे कोरडे आणि खाज सुटण्यापासून रोखू शकता.

२) हात वारंवार धुवा

बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी आणि आपले डोळे, चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी आपले हात वारंवार धुवा.

३) आहाराची काळजी घ्या

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश करा. तुम्ही जे अन्न खात आहात ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याची खात्री करा.

( हे ही वाचा: Health Tips : सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिताय ? जाणून घ्या कोणते पाणी पिणे चांगले)

४) झोपेची काळजी घ्या

तुमच्या शरीराच्या इतर भागांप्रमाणे, तुमच्या डोळ्यांना रिचार्ज करणे आवश्यक आहे आणि तुम्ही झोपत असताना हे घडते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excessive use of laptops and mobiles can cause eye strain take care this way gps
First published on: 30-06-2022 at 12:58 IST