अनेकदा लोकांमध्ये विसराळूपणा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ओव्हर बर्डन आणि जास्त बिझी असणाऱ्यांची मेमरी तेव्हढीच जास्त कमजोर असते, असं तज्ज्ञ म्हणतात. मेमरी, ध्यान किंवा दैनंदिन कामगिरी सुधारण्यासाठी मेंदूचा व्यायाम करणं महत्त्वाचं असतं. मेमरी पॉवर कशी वाढवायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात काही व्यायामाचा समावेश करून फायदा होऊ शकतो.

आपल्या सर्वांना माहित आहे की, नियमित व्यायाम शरीरासाठी आवश्यक आहे. विशेषत: जेव्हा आपण वृद्ध होतो आणि वृद्धत्वाशी संबंधित रोग आणि इतर आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका असतो.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या मते, लवचिकता आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइज गतीची श्रेणी राखण्यास मदत करू शकतात. बरेच लोक असा प्रश्न देखील विचारतात की, मनासाठी कोणते व्यायाम आहेत किंवा मेमरी वाढवण्यासाठी कोणते व्यायाम आहेत? इथे काही व्यायाम आहेत जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, तुम्ही तुमचा मानसिक तीक्ष्णपणा सुधारण्यासाठी आणि तुमच्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मग तुम्ही कितीही वयाचे असलात तरी. तुमची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी काही मेंदूचे व्यायाम केल्याने दैनंदिन कामे जलद आणि सुलभ होऊ शकतात.

१) दररोज पजल गेम खेळा

आयफेल टॉवरचा एक हजार तुकड्यांचा फोटो एकत्र करणे किंवा मिकी माऊस बनवण्यासाठी १०० तुकडे जोडणे, कोडे सोडवणे अशा अनेक खेळांमधून तुम्ही तुमच्या मेंदूला बळकट करू शकता. संशोधनात असे दिसून आले आहे की, जिगसॉ पझल खेळल्याने अनेक संज्ञानात्मक क्षमता वाढण्यास मदत होते. आपल्या मेंदूला आव्हान आणि व्यायाम करण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो.

२. पत्ते खेळून पहा

तुम्ही शेवटचा पत्त्यांचा खेळ कधी खेळला होता? प्रौढांसाठी मानसिक संशोधनानुसार, एक क्विक कार्ड गेम मेंदूच्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करू शकतो. एका अभ्यासात असेही समोर आले आहे की पत्ते खेळल्याने स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुधारते.

३. आपला शब्दसंग्रह तयार करा

चांगला शब्दसंग्रह हा तुम्हाला हुशार बनवण्याचा एक मार्ग आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या शब्दसंग्रहाला एका रोमांचक मेंदूच्या खेळात बदलू शकता? संशोधनानुसार, मेंदूची अनेक क्षेत्रे शब्दसंग्रह कार्यात सामील असतात, विशेषतः दृश्य आणि श्रवण प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली क्षेत्रे. वाचताना एक वही आपल्यासोबत ठेवा. एक अपरिचित शब्द टाइप करा, नंतर व्याख्या पहा. दुसऱ्या दिवशी हा शब्द पाच वेळा वापरण्याचा प्रयत्न करा.

४. अगदी मनमोकळेपणाने नृत्य करा

अनेक संशोधनांतून असे दिसून आले आहे की तुमच्या मेंदूच्या प्रक्रियेची गती आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी साल्सा, टॅप, हिप-हॉप किंवा डान्स क्लास लावू शकता. झुम्बा करा, मजेदार डान्स स्पेप्सचे ऑनलाइन व्हिडीओ पाहून ते शिकण्याचा प्रयत्न करा.

५. आपल्या सर्व इंद्रियांचा वापर करा

2015 च्या एका संशोधन अहवालात असं समोर आलं की तुमच्या सर्व इंद्रियांचा वापर केल्याने तुमच्या मेंदूला बळकटी मिळू शकते. तुमच्या इंद्रियांना आणि तुमच्या मेंदूला कसरत देण्यासाठी, तुमच्या पाचही इंद्रियांना एकाच वेळी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळी वास, स्पर्श, चव, पाहणे आणि ऐकणे यावर लक्ष केंद्रित केल्याने मेंदूचं स्वास्थ सुधारतं.