Extramarital Affairs : नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा व विश्वास असणे तितकेच महत्त्वाचे आहे. नात्यात प्रामाणिकपणा असेल, तर नाते अधिक काळ टिकते. हल्ली विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले आहे. ‘लव्ह मॅरेज’ असो की ‘अरेंज मॅरेज’ असो; लग्नानंतर अनेकदा विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिसून येतात. त्यामागील नेमकी कारणे काय आहेत, जाणून घेऊ या.

विवाहबाह्य संबंध म्हणजे काय?

विवाहित असताना पुरुष किंवा स्त्री अन्य पुरुष किंवा स्त्रीबरोबर संबंध ठेवत असेल, तर त्याला विवाहबाह्य संबंध म्हणतात. विवाहबाह्य संबंध लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज दोन्ही प्रकारांत दिसून येतात.
विशेष म्हणजे विवाहबाह्य संबंध फक्त शारीरिक संबंधाशी निगडित नाहीत. एखादी व्यक्ती जेव्हा भावनिकदृष्ट्या समोरच्या व्यक्तीबरोबर कनेक्ट असेल, तर ते नातेसुद्धा विवाहबाह्य संबंधात असू शकते.

हेही वाचा : मुलींनो, लग्नाला होकार देण्याआधी जोडीदाराबरोबर ‘या’ गोष्टींवर एकदा चर्चा करा, नाहीतर वैवाहिक जीवनात येऊ शकतात अडचणी

विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण का वाढतेय? काय आहेत कारणे?

  • अनेकदा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतात. अशा वेळी घरच्यांच्या दबावाखाली येऊन जे लोक लग्न करतात, अशा लोकांचे लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असण्याची शक्यता अधिक असते.
  • आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कामाचा ताण इतका असतो की, काही लोक जोडीदाराला आणि घरच्यांना वेळ देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये अनेकदा कामानिमित्त घराबाहेर असणारे लोक विवाहवाह्य संबंधाची शिकार होऊ शकतात.
  • अनेकदा कुटुंबाच्या दबावाखाली येऊन कोणतीही योजना न करता, काही जोडपी मुले जन्माला घालतात. त्यामुळे अचानक जबाबदारी वाढते. जबाबदारीपासून स्वत:ला दूर करीत रिलॅक्स राहण्यासाठी काही लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात.

हेही वाचा : Breakup Signs : जर ही लक्षणे दिसत असतील, तर तुमचे नाते फार काळ टिकणार नाही; वेळीच व्हा सावध …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • जर नात्यात प्रेम किंवा कोणताही उत्साह नसेल, तर स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी काही लोक विवाहबाह्य संबंधात अडकतात.
  • जर नवरा-बायकोच्या नात्यामध्ये शारीरिक संबंध चांगले नसतील, तर शारीरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी काही जण विवाहबाह्य संबंध ठेवतात.
  • अनेकदा नात्यात सर्व ठीक असताना नवरा-बायको भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या तितकेसे जवळ नसतात. अशा वेळी मनात सुरू असलेली घालमेल आणि भावना व्यक्त करण्यासाठी व्यक्ती भावनात्मक आधाराच्या शोधात असतात. याच नादात व्यक्ती अनेकदा विवाहबाह्य संबंध ठेवू शकते.
  • अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. अशा वेळी नात्यामध्ये अनेक गोष्टींवरून भांडणे होऊ शकतात. याच कारणामुळे कधी कधी व्यक्ती आर्थिक आधाराच्या शोधात विवाहबाह्य संबंधाकडे वळते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)