Facebook डेव्हलपर्स कॉन्फरंस F8 मध्ये कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकसाठी नवं डिझाइन जारी केलं आहे. या नव्या डिझाइनमध्ये न्यूज फिडमध्ये पूर्णतः बदल करण्यात आले आहेत. याशिवाय कंपनीने फेसबुकच्या डेटा प्रायव्हसीवर विशेष भर दिला आहे.
Facebook Redisign –
फेसबुकच्या नव्या अपडेटला FB5 नावाने ओळखलं जाईल असं सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केलं. या अपडेटमध्ये ग्रुप्स आणि इव्हेंट्सला हायलाइट करण्यात आलं आहे. म्हणजे एखाद्या ग्रुपला जॉइन केल्यानंतर तुम्हाला पर्सनलाइज्ड न्यूज फीड मिळेल, ही फीड केवळ तुमच्या मित्रांशी किंवा ओळखणाऱ्यांशी निगडीत असेल. याशिवाय ग्रुप इंटरअॅक्शनचाही पर्याय मिळेल.
Meet New Friends चा पर्याय मिळेल, यामध्ये सारखीच आवड असलेल्या अनोळखी व्यक्ती असतील (शाळा किंवा कार्यालय). याद्वारे मित्रांना शोधणं सोपं होईल, तसंच जवळपास होणाऱ्या इव्हेंट्सबाबतही माहिती मिळेल. या नव्या फीचरचं अपडेट अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना तात्काळ मिळेल, पण डेस्कटॉप वापरणाऱ्या युजर्सना या अपडेटसाठी काही महिने वाट पहावी लागेल.
Instagram –
फेसबुक F8 दरम्यान Instagram साठीही काही घोषणा करण्यात आल्या आहेत. आता इंस्टाग्रामच्या कॅमेरा इंटरफेसमध्ये Create Mode हा नवा पर्याय मिळेल. याद्वारे फोटोमध्ये कंटेंट अॅड करणं सोपं होईल आणि उत्तम पद्धतीने शेअर देखील करता येईल. शॉपिंगसाठी इंस्टाग्रामवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. आता इंस्टाग्राम अॅप ओपन केल्यानंतर तेथेच खरेदीसाठी पर्याय मिळेल. याशिवाय इंस्टाग्रामवरुन फोटो किंवा व्हिडीओंना मिळालेले लाइक लपवण्याच्या एका खास फीचरची इंस्टाग्रामकडून चाचणी सुरू आहे. याअंतर्गत जर लाइकचा पर्याय लपवला तर युजर आपल्या फोटो किंवा व्हिडीओंना किती लाइक मिळाले याचा अधिक विचार न करता केवळ फोटो अपलो़ड करण्यावरच लक्ष देईल. सध्या हे फीचर कॅनडामध्ये उपलब्ध करण्यात आलं आहे, जर हे फीचर लोकप्रिय ठरलं तर इतर देशांमध्येही हे फीचर जारी केलं जाईल.
Messenger –
Messenger साठीही नव्या फीचर्सची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय मेसेंजरची डिझाइन पुन्हा एकदा ठरवण्यात येत आहे. यामुळे स्टेटस मेसेज सेट करणं आणि फोटो शेअर करणं आधीपेक्षा सोपं झालंय. विशेष म्हणजे मेसेंजरचं नवं व्हर्जन 30MB पेक्षा कमी मेमरी वापरुन फोनमध्ये सेव्ह करता येईल, म्हणजे आधीपेक्षा 20% कमी मेमरी वापरली जाणार आहे. मेसेंजरवर चॅट करताना फेसबुकचे व्हिडीओ दोन्ही युजर एकत्र पाहू शकतील. तसंच फेसबुक याचवर्षी डेस्कटॉपसाठीही मेसेंजरचं नवं व्हर्जन लाँच करणार आहे.
फेसबुक ‘डेटिंग’ फीचर –
फेसबुकने हे फीचर गेल्यावर्षी जारी केलं होतं, आता हे फीचर 14 देशांमध्ये सुरू केलं जाणार आहे. यामध्ये Secret Crush नावाचं एक नवं फीचर आलं आहे. येथे फेसबुक फ्रेंड्सची सिक्रेट यादी बनवता येते. जर दुसरं कोणी सिक्रेट क्रशचा पर्याय वापरत असेल आणि त्याने तुम्हाला त्याच्या सिक्रेट यादीमध्ये अॅड केलं तर फेसबुक तुम्हाला याबाबत कल्पना देईल. या फीचरबाबत अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.
Oculus Rift S आणि Oculus Quest ची विक्री पुढील महिन्यापासून –
फेसबुकने व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट Oculus Rift S आणि Oculus Quest च्या विक्रीबाबत माहिती दिली आहे. या दोन्ही फोनसाठी 12 मेपासून विक्री सुरू होत असून 22 देशांमध्ये हे फोन उपलब्ध असतील.