scorecardresearch

फॅटी लिव्हर रोगाची ही ‘५’ लक्षणं दुर्लक्षित करू नका

एका रिसर्चनुसार भारतातील ९ ते ३२ टक्के लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग असू शकतो

fatty liver,
एका रिसर्चनुसार भारतातील ९ ते ३२ टक्के लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग असू शकतो

फॅटी लिव्हर रोगाचे लक्षण: आजकालचा बदलत्या जीवनशैलीत फॅटी लिव्हर असणे सामान्य होत आहे, परंतु जर त्याची लक्षणे ओळखून वेळीच उपचार केले केले नाहीत तर नंतर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एका रिसर्चनुसार भारतातील ९ ते ३२ टक्के लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग असू शकतो. या रोगाचे काही धोक्याचे संकेत आहेत, जे सुरुवातीला दिसत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया कोणती पाच मोठी कारणे आहेत, ज्यामुळे तुमच्या लिव्हरमध्ये फॅट वाढते. जेणेकरुन तुम्ही वेळेत ही लक्षणे ओळखून उपचार घेऊ शकता.

वाढत्या वजनामुळे फॅटी लिव्हरही होते
फॅटी लिव्हर रोग हा एक आजार आहे. ज्यामध्ये यकृताच्या पेशींमध्ये जास्त चरबी जमा होते. हा आजार सामान्य झाला आहे. यात यकृत नीट काम करू शकत नाही आणि अनेक वेळा समस्या समोर येतात. काहीवेळा वजन वाढल्यामुळे फॅटी लिव्हर देखील होतो.

आणखी वाचा : “थोडी तरी लाज बाळग…”, मुलगी आयरा खानच्या ‘त्या’ फोटोवरून आमिर खान झाला ट्रोल

थकवा जाणवणे
जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हे फॅटी लिव्हरचेही लक्षण आहे. म्हणजेच, जर तुम्हाला या प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब चाचणी करून घ्यावी.

आणखी वाचा : सकाळची छोटीशी चूक होऊ शकते अ‍ॅसिडिटीचे कारण, ही सवय लगेच सुधारा

अशक्तपणा हे देखील एक लक्षण आहे
तुम्हाला खूप अशक्त वाटत असलं तरी, तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण यामुळे तुमच्यासाठी समस्या देखील उद्भवू शकतात. अनेकवेळा असे दिसते की काही पोषक तत्वांमुळे शरीरात अशक्तपणा येत आहे, परंतु हे फॅटी लिव्हरचे देखील लक्षण असू शकते.

आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?

ओटीपोटाच्या या भागात वेदना
जर तुम्हाला तुमच्या पोटाच्या वरच्या उजव्या भागात वारंवार वेदना होत असतील, तर ते हलके घेऊ नका, कारण ते फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते. म्हणजे वेळीच डॉक्टरांना दाखवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fatty liver do not ignore these 5 things dcp

ताज्या बातम्या