FAU-G (Fearless and United Guards) गेमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. PUBG Mobile India गेमला टक्कर देण्यासाठी येऊ घातलेल्या मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या गेमने लाँचिंगआधीच 10 लाखांहून जास्त प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केलाय. आता युजर्सचे डोळे या गेमच्या लाँचिंग तारखेकडे लागून राहिले आहेत. लेटेस्ट रिपोर्टमध्ये FAU-G  लाँच टाइमलाइन समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केव्हा लाँच होणार? :-
FAU-G गेमला डेव्हलप करणाऱ्या बेंगळुरूच्या nCore गेम्सने नोव्हेंबरमध्ये हा गेम लाँच करण्याची घोषणा केली होती. पण नोव्हेंबरमध्ये हा गेम लाँच झाला नाही, आणि अद्याप गेम नेमका कधी लाँच होणार त्याबाबतची अधिकृत माहितीही समोर आलेली नाही. आता InsideSport ने  FAU-G गेमच्या डेव्हलपर्समधील सुत्रांच्या आधारे हा गेम याच महिन्यात लाँच केला जाऊ शकतो असं म्हटलंय.  सर्वकाही आलबेल राहिल्यास डिसेंबरमध्येच हा गेम रोलआउट केला जाईल असं रिपोर्टमध्ये नमूद केलंय.

दरम्यान, 30 नोव्हेंबरपासून  FAU-G  गेम Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झालाय. सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉइड युजर्ससाठीच येण्याची शक्यता आहे, कारण अद्याप अ‍ॅपलच्या App Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही. प्री-रजिस्ट्रेशनला सुरूवात होताच अवघ्या 24 तासांमध्येच या गेमने 10 लाख प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केला. रजिस्टर करणाऱ्या प्लेयर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्सना गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल. या गेमची साइज किती असेल आणि व्हर्जन कोणतं असेल याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र प्ले-स्टोअरवरील लिस्टिंगद्वारे गेमच्या स्टोरीलाइन आणि गेम-प्लेबाबत थोडी माहिती देण्यात आली आहे. गेमच्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता लिस्टिंग पेजवरुन पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल असं दिसतं. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faug mobile launch date new update on faug all set to be released in december sas
First published on: 07-12-2020 at 13:12 IST