scorecardresearch

राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाल्याची भीती; जाणून घ्या व्यक्ती ब्रेन डेड होते म्हणजे नेमकं काय होतं?

Raju srivastava Health Updates: राजू श्रीवास्तव यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे. त्याचं हृदयही नीट काम करत नाही.

राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाल्याची भीती; जाणून घ्या व्यक्ती ब्रेन डेड होते म्हणजे नेमकं काय होतं?
राजू श्रीवास्तव यांचं ब्रेन डेड झाल्याची भीती(photo: indian express)

Raju srivastava Brain Dead: हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलेले प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिकच बिघडत चालली आहे. राजू श्रीवास्तव सलग आठ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने गुरुवारी त्यांचे आरोग्य अपडेट जारी केले. त्यात तिने असं सांगितल की त्यांचे हृदय आता काम करत नाही. तसंच मिडीया रिपोर्ट्सनुसार राजू श्रीवास्तव यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे. तर ब्रेन डेड म्हणजे काय? ते होण्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ब्रेन डेड म्हणजे काय? (What is Brain Dead?)

जेव्हा मानवी मेंदू पूर्णपणे काम करणे थांबवतो तेव्हा ब्रेन डेड ही स्थिती असते. या स्थितीत, कोणतीही चर्चा किंवा सिग्नल मानवी मेंदूकडे जात नाही. जेव्हा मेंदू मृत होतो त्यानंतर संपूर्ण मानवी शरीर काम करणे थांबवते. ब्रेन डेड झाल्यास माणसाचे डोळे मिचकावणे, श्वास घेणे आणि शरीराची हालचाल शून्य होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रेन डेड झाल्यास, व्यक्तीला सामान्यपणे श्वास घेता येत नाही, म्हणून रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते जेणेकरून त्याचा श्वास चालू राहील. ब्रेन डेड झाल्यास बरे होण्याची शक्यता एकदम कमी असते.

( हे ही वाचा: औषधं घेताना चुकूनही करू नये ‘या’ गोष्टींचे सेवन; आरोग्यावर होईल वाईट परिणाम)

ब्रेन डेडमध्ये कोणते अवयव काम करतात? (Can organs function after brain death?)

ब्रेन डेड झाल्यास माणसाचा मेंदू अर्थातच काम करत नाही, पण त्याचे बाकीचे अवयव जसे की यकृत आणि किडनी चांगले काम करतात. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर, ब्रेन डेड ही अशी स्थिती आहे, जेव्हा एखादी व्यक्ती जिवंत असूनही त्याला आपल्यासोबत काय होत आहे हे लक्षात देखील येत नाही. ब्रेन डेडचा रुग्ण शरीराच्या कोणताही भाग दुखत असला तरीही प्रतिसाद देत नाही.

मेंदू मृत झाल्यास माणूस किती काळ जगू शकतो?

न्यूरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती ब्रेन डेड असेल तर तो किती दिवस किंवा किती तास जिवंत असेल, हे त्याच्या ब्रेन डेड होण्याच्या कारणावर अवलंबून असते. अनेक प्रकरणांमध्ये, रुग्ण काही महिने जगतो, तर काही प्रकरणांमध्ये ही शक्यता फक्त काही तास देखील असू शकते. न्यूरोलॉजिस्ट म्हणतात की काही वेळा औषधांचा अधिक डोस, घातक ब्रेन इंफेक्शन, मेंदूला दुखापत झाल्यामुळे ब्रेन डेड होण्याची शक्यता जास्त असते. राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल सांगायला गेलं तर, १० ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांचा एमआरआय करण्यात आला, त्यात डोक्यातली एक नस दबल्याची माहिती समोर आली.

( हे ही वाचा: Heart Disease: निरोगी राहण्यासाठी हृदयरोग्यांनी ‘या’ गोष्टी नाश्त्यात खाव्यात; मिळेल भरपूर फायदा)

ब्रेन डेड आणि कोमा मध्ये काय फरक आहे?

बर्‍याच वेळा अनेकांना असे वाटते की ब्रेन डेड आणि कोमाची स्थिती ही सारखीच असते. पण या दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. कोमाच्या बाबतीत, रुग्णाच्या पुनर्प्राप्तीची शक्यता खूप जास्त असते. कोमामध्ये रुग्णाचा मेंदू काम करत असतो. कोमात असलेल्या रुग्णाच्या आजूबाजूला काय होत आहे. कोण काय बोलतंय या सगळ्या गोष्टी त्याच्या मनापर्यंत पोहचतात आणि बाकीच्या शरीरालाही सिग्नल देतात. पण ब्रेन डेडच्या बाबतीत या शक्यता नसतात. म्हणजेच कोमा नंतरची स्थिती ब्रेन डेड आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या