श्रावण महिन्यापासून हिंदू सणांना सुरुवात होते. आता बघता बघता नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी हे सण येतील. आपल्याकडे सण-समारंभाच्या वेळी मेहंदी काढली जातेच. बहुसंख्य महिलांना सणसमारंभांच्या वेळी मेहंदी काढणे आवडते. भारतातील महिलांचे सण हातावर मेहंदी लावल्याशिवाय अपूर्ण आहेत.

आजकाल बाजारात मेहंदीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, जे काही वेळ लावल्यानंतर लगेचच हातावर गडद रंग येतो. मात्र, जो रंग आणि सुगंध पारंपारिक मेहंदीमध्ये असतो, तो टॅटू मेहंदीमध्ये दिसत नाही. मेहंदीच्या गडद रंगाला घेऊन आपल्याकडे अनेक समजुती आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या नजरा एकमेकांच्या मेहंदीच्या रंगावर खिळलेल्या असतात. त्यामुळेच मेहंदी लावल्यानंतर सर्वच स्त्रिया त्याच्या रंगाबद्दल चिंतेत असतात. आज आपण अशा काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मेहंदीचा रंग अधिक गडद करू शकता.

श्रावण सोमवारी व्रत करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या उपवासासाठीचा हेल्दी डाएट प्लान

मेहंदी सुंदर आणि गडद करण्यासाठी या टिप्स फॉलो करा:

  • सर्वप्रथम मेहंदी सुकल्यानंतरही काही तास पाण्यापासून दूर ठेवा आणि धुण्यापूर्वी हातांना तेल लावा.
  • मेहंदी सुकल्यानंतर त्यावर लिंबू आणि साखरेचे मिश्रण कापसाच्या मदतीने लावा आणि सुकू द्या. तुम्ही हे मिश्रण मेहंदी धुण्यापूर्वी अनेक वेळा लावू शकता.
  • तवा मंद आचेवर ठेवा आणि त्यात चार ते पाच लवंगा टाकून धूर आल्यावर त्यावर मेहंदीचे हात काळजीपूर्वक शेकून घ्या. लवंगाच्या धुरामुळे मेहंदीचा रंग वाढतो.
  • मेहंदी सुकवून त्यावर चुना चोळल्यास रंग गडद होतो.
  • मेहंदी सुकल्यानंतर कापसाच्या साहाय्याने मोहरीचे तेल किंवा पेपरमिंट तेल हातावर लावा.
  • विक्स आणि आयोडेक्स सारखे बाम गरम असतात, ज्याच्या उष्णतेमुळे मेंदीचा रंग जाड आणि गडद होतो.
  • मेहंदी सुकल्यानंतर त्यावर लोणच्यामध्ये असलेले मोहरीचे तेल लावा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या.

Skin Care Tips : वयाच्या तिशीनंतरही तरुण दिसण्यासाठी आजपासूनच फॉलो करा ‘या’ टिप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)