Nasal Congestion Relief : बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, नाक बंद होणे किंवा कफ होणे ही अतिशय सामान्य तक्रार आहे. हवामानातील बदलांमुळे शरीराला जुळवून घेण्यात त्रास होतो, त्यातच रोगप्रतकारशक्ती कमी झाली की सर्दी- खोकला पटकन होतो. थंड किंवा गरम वातावरणातील अचानक बदल, धूळ, धूर, परागकण (pollen) यामुळे होणारी अ‍ॅलर्जी, थंड पेय-पदार्थांचे सेवन, ताणतणाव आणि अपुरी झोप – हे सगळे घटक या समस्येला आमंत्रण देतात.

योगगुरू आणि आयुर्वेद तज्ज्ञ बाबा रामदेव यांनी या सगळ्या त्रासांवर काही सोपे, घरच्या घरी करता येणारे उपाय सांगितले आहेत. हे उपाय शरीरातील कफ कमी करून बंद नाक, सर्दी आणि श्वसनातील अडथळे दूर करण्यात मदत करतात.

१. बदाम, काळी मिरी आणि खांड – सर्दीवर आयुर्वेदिक त्रिकुट (Almond, Black Pepper & Sugar Mix)

बाबा रामदेव यांच्या मते, सर्दी-खोकला आणि नाक बंद होण्याची समस्या कमी करण्यासाठी हा पारंपरिक उपाय अतिशय प्रभावी आहे. १०० ग्रॅम बदाम, २० ग्रॅम काळी मिरी आणि ५० ग्रॅम खडी साखर एकत्र बारीक करून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचा एक चमचा गरम दूध किंवा पाण्यासह घ्या. हे मिश्रण शरीरातील उष्णता वाढवते, जमा झालेला कफ वितळवते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. नियमित सेवनाने वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासूनही बचाव होतो.

२. नाकात मोहरीचं तेल टाका – नैसर्गिक नाक स्प्रे (Mustard Oil Nasal Drops)

नाक बंद होणे किंवा सायनससारख्या समस्या कमी करण्यासाठी हा उपाय सोपा आणि त्वरित परिणाम देणारा आहे. रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ हातांनी किंवा ड्रॉपरने नाकात दोन-दोन थेंब मोहरीचं तेल टाका. यामुळे नाकातील सूज कमी होते, श्वसनमार्ग ओलसर राहतात आणि श्वास घेणं सुलभ होतं. मोहरीच्या तेलातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सायनस आणि अ‍ॅलर्जीपासून संरक्षण देतात.

३. त्रिकटु काढा – सर्दीवर रामबाण उपाय (Trikatu Kadha for Cold & Cough)

आयुर्वेदात त्रिकटु म्हणजे सोंठ, काळी मिरी आणि पिपळी यांचं मिश्रण कफ नष्ट करणाऱ्या औषधी म्हणून प्रसिद्ध आहे. अर्धा चमचा त्रिकटु पावडर १०० मिली पाण्यात उकळा. पाणी अर्धं झाल्यावर गाळून दिवसातून एक-दा दोनदा प्या. हा काढा शरीरातील कफ वितळवतो, गळ्याची खरखर कमी करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. बाबा रामदेव यांच्या मते, नियमित सेवनाने नाक बंद होणे, थंडी आणि वारंवार होणारा खोकला पूर्णपणे दूर होतो.

४. वाफ घेणे – नाक मोकळं करण्याचा सोपा उपाय (Steam Inhalation for Nasal Relief)

नाक बंद होणे, डोकेदुखी किंवा गळ्याची जळजळ – या सगळ्यांसाठी वाफ घेणे सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. गरम पाण्यात एक चमचा ओवा किंवा काही थेंब पुदिन्याचं तेल टाका. डोक्यावर टॉवेल ठेवून ५-१० मिनिटे वाफ घ्या. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो, जमा झालेला कफ बाहेर पडतो आणि श्वास घेणं सहज शक्य होतं. दिवसातून दोनदा वाफ घेतल्यास सायनस आणि सर्दीपासून मोठा आराम मिळतो.

५. योग आणि प्राणायाम – श्वसनमार्ग मजबूत करण्याचा मार्ग (Yoga & Pranayama for Respiratory Health)

बाबा रामदेव सांगतात की, प्राणायाम हा नैसर्गिक औषधासारखा आहे. रोज सकाळी कपालभाति, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करा. कपालभाति श्वसनसंस्थेतील कफ दूर करते, अनुलोम-विलोम ऑक्सिजनचा प्रवाह संतुलित ठेवतो आणि भ्रामरी सायनसचा ताण कमी करते. या आसनांचा नियमित सराव केल्यास नाक बंद होणे, अ‍ॅलर्जी, खोकला यांसारख्या समस्या मुळातून दूर होतात.

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी-खोकला आणि कफसारख्या समस्या टाळायच्या असतील, तर शरीराची इम्युनिटी वाढवणं आणि या घरगुती उपायांना दैनंदिन जीवनात समाविष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. औषधांवर अवलंबून न राहता, आयुर्वेद आणि योगाच्या या साध्या पद्धती नैसर्गिकरीत्या आरोग्य सुधारतात आणि शरीराला ऋतुबदलास अनुकूल ठेवतात.