food items help in weight loss in navratri fast | Loksatta

नवरात्रीत ‘या’ पदार्थांचे करा सेवन, वजन कमी होण्यासह इम्युनिटी वाढण्यात होईल मदत

नवरात्रीमध्ये उपवास आणि आरोग्य याचा मेळ साधत वजन ( Weight loss in Navratri ) कमी करायचे असेल तर आहाराची काळजी घ्यावी लागेल. आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

नवरात्रीत ‘या’ पदार्थांचे करा सेवन, वजन कमी होण्यासह इम्युनिटी वाढण्यात होईल मदत
प्रतिकात्मक छायाचित्र

शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे. सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रीमध्ये काही लोक पूर्ण नऊ दिवस उपवास ठेवतात. देवीची पूजा करणारे लोक उपवासाचे वेगवेगळे नियम पाळतात. अशावेळी उपवास करतानाच वजन ( Weight loss in Navratri ) कमी करायचे असेल तर आहाराची काळजी घ्यावी लागेल. आहारात तुम्ही पुढील पदार्थांचा समावेश केला तर तुमचे वजन कमी होऊ शकते, तसेच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढू शकते.

१) नारळ पाणी

नारळ पाणीमध्ये कोलेस्ट्रोल, प्रथिने, कार्बोहायड्रेट, डायेटरी फायबर, फोलेट आणि जीवनसत्वे असतात. दिवसातून एक दोन वेळा नारळ पाणी पिता येऊ शकते. याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.

(रशियातील वटवाघुळात आढळला ‘हा’ Covid सारखा विषाणू, त्यावर लसीचाही प्रभाव नाही)

२) भिजवलेले सुके मेवे

उपवास करताना तुम्ही भिजवलेले सुके मेवे खाऊ शकतात. सुके मेवे खालल्याने तुम्हाला अनेक पोषक तत्व मिळतील आणि अशक्तपणा दूर होईल. सुका मेवा रात्री भिजवून त्याचा आहारात समावेश करावा.

३) पपई

उपवासाच्या वेळी पोट साफ न होण्याची तक्रार असते. अशात पपई खा. पपईमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व क आढळते. याने पोट साफ होण्यास मदत होईल आणि उपवास सुटल्यावर फूड पॉइजनिंगचा धोका टळेल.

(या उपायांनी केळीसह ‘हे’ 5 पदार्थ अधिक काळ टिकू शकतात, जाणून घ्या)

४) दूध

दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि रायबोफ्लेविन असतात. दूध पिल्याने भूक लागत नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
International Tourism Day 2022: जागतिक पर्यटन दिवस कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि थीम

संबंधित बातम्या

मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय, तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या त्यामागचं कारण
हिवाळ्यात जिममध्ये न जाता वजन कमी करण्यासाठी फाॅलो करा ‘या’ ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: कोणाच्या चुकांमुळे उद्योग बाहेर गेले?
पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक
खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”