Fridge ice cleaning tips: फ्रिज ही आपल्या रोजच्या वापरातील सर्वात महत्वाची वस्तू आहे. विशेषतः उन्हाळ्यात तर आपल्याला फ्रिजची गरज भासतेच. फ्रिज अनेक कारणांसाठी आपल्याला उपयुक्त ठरतो. फ्रिजमध्ये पाणी थंड करण्यापासून ते भाज्या स्टोअर करुन ठेवण्यापर्यंतची सगळी कामे केली जातात. फ्रिज हा आपल्या रोजच्या वापरासाठी कितीही उपयोगी पडला तरीही दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनतर फ्रिजरमध्ये जो बर्फ साचतो तो साफ करणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच.तुमच्याही जर फ्रीजरमध्ये बर्फाचा ढीग वाढत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आजकाल, अनेक रेफ्रिजरेटरमध्ये डीफ्रॉस्ट बटण असते, जे दाबल्यावर काही क्षणात सर्व गोठलेला बर्फ वितळतो. पण जर तुमच्या फ्रीजमध्ये ते नसेल किंवा ते खराब झाले असेल, तर येथे दिलेल्या पद्धती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
जर तुम्हाला फ्रीजरमध्ये बर्फाचा ढीग दिसला आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तो चाकू किंवा कोणत्याही धारदार वस्तूने काढू शकता, तर ही चूक अजिबात करू नका. यामुळे फ्रीजरचा गॅस पाईप पंक्चर होऊ शकतो. यामुळे तुमच्या फ्रीजची कूलिंग खराब होऊ शकते.ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण खूप वाढते. मात्र काही टीप्स वापरून तुम्ही हा बर्फ क्षणात वितळवू शकता.
फ्रीजरमध्ये जास्त बर्फ साचण्याचे तोटे
जर फ्रीजरमध्ये जास्त बर्फ साचत असेल तर ते हवेच्या प्रवाहात अडथळा आणू शकते. यासोबतच, थंड होण्याची क्षमता कमी होऊ शकते. इतकेच नाही तर त्यामुळे कंप्रेसरवरील दाब देखील वाढतो.यामुळे तुमचे वीज बिलही वाढू शकते. तसेच, रेफ्रिजरेटर जास्त गरम होऊ शकतो. अशा परिस्थितीत शॉर्ट सर्किट होण्याचा धोका देखील असतो.
फ्रीजरमधून बर्फ काढण्याचे सोपे मार्ग
सर्वप्रथम, फ्रीज बंद करा आणि त्यातील सर्व सामान बाहेर काढा. नंतर फ्रीजरमध्ये एक वाटी कोमट पाणी ठेवा. काही वेळाने बर्फ वितळू लागेल. स्वच्छ कापडाने ते स्वच्छकरा. फ्रीजवरील रबर सील टूथब्रशने स्वच्छ करा. कोरड्या कापडाने ते पुसून टाका.
टेबल फॅनने बर्फ काढा
बर्फ काढण्यासाठी, प्रथम रेफ्रिजरेटर बंद करा. फ्रीजरकडे तोंड करुन टेबल फॅन चालू करा. हवेमुळे बर्फ देखील लवकर वितळू शकतो. रेफ्रिजरेटर पुन्हा चालू करा. तापमान सेट करा.
फ्रीजरमध्ये जास्त वस्तू ठेवू नका
दर महिन्याला तुमचा रेफ्रिजरेटर फ्रीजर स्वच्छ करायला विसरू नका. फ्रीजरमध्ये जास्त वस्तू ठेवू नका. रेफ्रिजरेटरचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका. रेफ्रिजरेटरमध्ये गरम अन्न अजिबात ठेवू नका.जर तुमच्या फ्रीजरमध्ये खूप जास्त बर्फ जमा झाला असेल, तर तुम्ही एखाद्या व्यावसायिकाच्या मदतीने त्याची देखभाल करू शकता