Plant Care Tips: सकाळी उठल्यावर अंगणात फुलांनी बहरलेली झाडं पाहणं म्हणजे दिवसाची सुरुवातच सुंदर होणं. पण, प्रत्येकाच्या अंगणात हे असं होतंच, असं नाही. अनेकदा कितीही औषधं, खतं, पाणी देऊनही फुलझाडांची पानगळ सुरूच राहते. पण, एका अनुभवी माळीच्या सल्ल्याने अनेक घरांतील कुंड्यांतील फुलझाडं बहरू लागल्यानं, त्यांच्या घरात आता जणू फुलांचा वर्षाव होऊ लागला आहेत. लोकांना विश्वासच बसत नाही की, फुलझाड इतक्या सुंदर रीतीनं बहरायला काहीही खर्च आलेला नाही.

ही बातमी एका इन्स्टाग्राम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे, जिथे Gardenhood888 नावाच्या एका गार्डनिंग पेजवर झाडांमध्ये ‘एक वस्तू’ टाकल्यामुळे त्यामध्ये भरघोस फुलं आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही वस्तू प्रत्येकाच्या घरात अगदी सहज मिळते.

या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं की, ती गोष्ट झाडांना नैसर्गिकरीत्या पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन व मॅग्नेशियम देते जे कोणत्याही झाडाच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहेत. फक्त ही गोष्ट योग्य प्रकारे झाडांच्या मुळाशी टाकली, तर ती हळूहळू विघटित होत झाडाला पोषण देत राहते. अनेक प्रयोगकर्त्यांनी या उपायामुळे त्यांची कुंडी फुलांनी ओसंडून वाहू लागली, असा अनुभव सांगितला आहे.

अनेक जण तर याचा द्रव बनवून दर आठवड्याला झाडांना देतात. कोणी म्हणतं त्यामुळे फुलं येणं दुप्पट झालंय, कोणी म्हणतं झाडं आता कधीच सुकत नाहीत. एवढंच नाही, तर घरगुती कंपोस्टमध्येही या वस्तूचा उपयोग केल्यानं तयार होणारं खत अधिक पोषणमूल्यांनी युक्त होतं.

मग ‘ती वस्तू नेमकी आहे तरी काय?

तर ती वस्तू आहे – बटाट्याची सालं!

होय, तुम्ही जे सहजपणे कचऱ्यात फेकून देता, ते बटाट्याचं साल तुमच्या घरच्या झाडांसाठी अमृत ठरू शकतं. त्या सालात असणाऱ्या नैसर्गिक पोषणद्रव्यांमुळे फुलझाडाला एक नैसर्गिक टॉनिक मिळतं आणि ते झाड फुलांनी बहरायला सुरुवात होते. पण, लक्षात ठेवा – बटाट्याची सालं कोरडी करून वापरणं गरजेचं आहे; अन्यथा कीटकांचा त्रास होऊ शकतो.

बटाट्याच्या सालींमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व नायट्रोजन हे घटक भरपूर प्रमाणात असतात. पोटॅशियम झाडांना रोगप्रतिकार शक्ती देतो, फुलं वाढवतो व मुळे मजबूत करतो. मॅग्नेशियम झाडाच्या पानांमध्ये क्लोरोफिल तयार करतो आणि प्रकाश संश्लेषण सुधारतो. फॉस्फरस व नायट्रोजनमुळे झाड लवकर आणि भरघोस वाढतं.

वापरण्याची योग्य पद्धत

बटाट्याच्या साली थेट मातीमध्ये टाकू नका. त्या आधी दोन-तीन दिवस उन्हात वाळवून घ्या. नंतर कुंडीतील माती खणून, त्या मातीमध्ये साली मिसळून टाका आणि त्यावर थोडंसं पाणी घाला. त्यामुळे साली हळूहळू कुजतील आणि झाडाला पोषण देत राहतील.

दुसरा पर्याय म्हणजे – सालं उकळून, त्यांचा रस तयार करा आणि थंड झाल्यावर तो थेट झाडांच्या मुळाशी ओता. झाडांसाठी एक नैसर्गिक खाद्य आहे, जे लगेच झाडाला ऊर्जा देईल. तुम्ही हाच रस काही दिवस ठेवूनही वापरू शकता.

जर तुमच्याकडे कंपोस्ट खतनिर्मितीसाठी वेगळ्या स्वतंत्र डब्याची व्यवस्था केलेली असेल, तर साली त्यात टाका. त्यामुळे कंपोस्ट प्रक्रियेला गती मिळेल आणि तुमचे सेंद्रिय खत अधिक प्रभावी बनेल.

येथे पाहा व्हिडीओ

दक्षता घेण्याजोग्या काही बाबी खालीलप्रमाणे :

  • काही साली बारीक केल्यानं, त्या लवकर कुजतात आणि मातीला लवकर पोषण मिळतं.
  • उरलेल्या साली पूर्णपणे मातीखाली गाडा; अन्यथा त्या किड्यांना आकर्षित करू शकतात.
  • जर बटाटा सडलेला असेल, तर त्याच्या साली झाडांसाठी वापरू नयेत.

आता पुढच्या वेळी बटाटे सोलताना त्या साली कचऱ्यात न टाकता फुलझाडाच्या कुंडीतील मातीत आतपर्यंत गाडा… आणि मग पाहा तुमचा बगीचा कसा फुलांनी बहरेल.