चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याचा सण. गुढीपाडवा या सणाची आपण सर्वचं जणं आतुरतेनं वाट पाहत असतात. कारण या दिवशी हिंदू नववर्षाची सुरूवात होते. भारतात सणासुदीच्या वेळी पारंपारिक पोशाख परिधान करणे आवश्यक असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्व महिला नऊवारी सुंदर साडी, सलवार-कुर्ती अशा पारंपारिक पोशाखांमध्ये दिसतात पण पुरुष मात्र वारंवार प्रत्येक सणाला वापलेल्या एखाद्या कुर्त्यामध्ये दिसतात. पारंपारिक कपड्यांच्या बाबतीत नक्की काय परिधान करावे हे समजत नाही. पण काळजी करु नका, पुरुषांकरिता पारंपारिक पण स्टायलिश असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला या गुढीपाढव्याला तयार होण्यासाठी काही फॅशन टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही सर्वोत्तम दिसाल.

नेहरु जॅकेट देईल हटके लूक

या गुढीपाडव्याला तुम्ही एखाद्या साध्या कुर्त्यावर चांगले नेहरू जॅकेट आणि धोती परिधान करु शकता. त्यामुळे तुम्हाला थोडासा पारंपारिक आणि थोडा ट्रेंडी लूक देखील मिळेल. एम्ब्रॉयडरी केलेले पांढरे नेहरू जॅकेट तुम्हाला चर्चेत आणू शकते. नेहरू जॅकेट सेट निवडताना प्रथम तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप आणि जुळणारी उंची निवडा.

कुर्त्यामध्ये देखील आहेत अनेक पर्याय

चिकनकारी कुर्ता तुम्हाला गर्दीत उठून दिसण्यासाठी मदत करेल. साधा एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता घातल्याने तुम्हाला सर्वांचे वेधून घेऊ शकता. मिरर वर्क, धागा, भरतकाम केलेल कुर्ते पुरुषांसाठी गुढीपाडव्यासारख्या प्रसंगी उत्तम पर्याय आहेत. साधा पांढरा कुर्ता सेट तुमच्या पांरपारिक लूकला फॅशन ट्विस्ट देऊ शकतो.


जर तुम्ही शॉर्ट कुर्ता निवडणार असाल तर तो पटियाला पँट, हॅरेम आणि धोतीसोबत चांगला दिसतो आणि जर लांब कुर्ता निवडणार असाल तर तो चुडीदार किंवा फिट ट्राउझर्ससोबत चांगला दिसतो. याशिवाय तुम्ही सेमी-फॉर्मल शर्ट किंवा बटण-डाउन कुर्ते निवडू शका जे तुम्हाला पारंपारिक लूक मिळवून देतात आणि त्यावर तुम्ही धोतर अथवा बॅगी पँन्ट चांगली दिसते.

पोशाख निवडताना रंगाकडे द्या लक्ष

पारंपारिक पोशाष निवडताना योग्य रंगांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कित्येकदा साधा रंग व्यक्तीला वेगळा लूक देऊ शकते. तुम्ही तुमच्या त्वचेच्या रंगासाठी उत्तम दिसणारे रंग निवडा. पांढरा रंग अनेकांसाठी उत्तम पर्याय आहे. पुरुषांसाठी रॉयल आणि डॅशिंग लूककरिता पांढरा रंग कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही.

International Day of Happiness: इतरांना आनंदी ठेवण्याचे ‘हे’ आहेत पाच सोपे मार्ग, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 अ‍ॅक्सेसरीमुळे खुलतो तुमचा लूक

ब्रेसलेट्स, नेकपीस आणि पारंपरिक फुटवेअर यांसारख्या  अ‍ॅक्सेसरीजमुळे सामान्य कुर्ता पायजमा थोडा हटके आणि स्टायलिश दिसू शकते. तुमच्या सणाच्या कुर्त्याचे वैभव दर्शविण्यासाठी त्यावर स्टायलिश पिन, पॉकेट स्क्वेअर किंवा ब्रोचेस वापरा. मनगटावर घड्याळ, ब्रेसलेट परिधान करा. तुम्ही पारंपारिक पोशाखावर सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी परिधान करु शकता. त्यामुळे तुमचा लूक आणखी भारदस्त दिसेल. पारंपारिक पोशाखानुसार, तुम्ही पायामध्ये काय घालत आहात याकडे लक्ष द्या. तुम्ही टोकदार जुती, कोल्हापुरी चप्पल किंवा अगदी फॉर्मल शूज निवडू शकतात.

आरामदायी कपडे निवडा

फॅन्सी दिसण्यासाठी कित्येकदा आपण असे कपडे परिधान करतो जे तुमच्यासाठी आरामदायी असतील. तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीचे धोतर परिधान करणे सोयीस्कर वाटत नसेल तर तुम्ही शिवलेली धोती किंवा आरामदायी पायजमा निवडू शकता. कुर्ता निवडताना तुम्ही आरामासाठी कॉटन -लिननचे कापड निवडू शकतात.