Kitchen Jugaad: पावसाळ्यात आर्द्रता वाढू लागते आणि त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये कीटक आणि बुरशीदेखील दिसू लागते. अनेकदा या ऋतूमध्ये गव्हाला किडेदेखील लागतात. जर योग्य वेळी हे किडे काढले गेले नाही, तर गहू खराब होऊ लागतात. अशा वेळी तुम्ही काही घरगुती सोप्या टिप्सचा वापर करून गहू सुरक्षित ठेवू शकता.

या सोप्या उपायांनी गव्हातील किडे होतील दूर

कडुलिंबाच्या पानांचा वापर

कडुलिंबामध्ये जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात, किड्यांना जवळ येऊ देत नाहीत. तुम्ही कडुलिंबाची पाने गव्हाच्या पोत्यात किंवा डब्यामध्ये ठेवू शकता. परंतु, त्यासाठी तुम्हाला दर १५-२० दिवसांनी ही पाने बदलायला हवीत.

लवंग आणि तमालपत्र वापरा

लवंग आणि तमालपत्र हे गरम मसाल्यातील दोन्ही पदार्थ गव्हातील किड्यांना दूर ठेवण्यास मदत करतात. खरं तर किड्यांना लवंगाचा तीव्र वास आवडत नाही, ज्यामुळे ते गव्हाच्या आसपास फिरकत नाहीत. तुम्ही सुमारे ५० किलो गव्हात २०-२५ लवंगा आणि ४-५ तमालपत्र टाकू शकता.

गहू उन्हात पसरवून वाळवा

पावसाळ्यात गहू ओले होतात, ज्यामुळे किडे किंवा भुंगे त्यावर हल्ला करू लागतात. हे टाळण्यासाठी दर १५-२० दिवसांनी गहू काही तास उन्हात पसरवून ठेवा. त्यामुळे गव्हातील ओलावा दूर होईल आणि त्यावर हल्ला करणारे किडेही निघून जातील.

धान्य उघड्यावर ठेवू नका

पावसाळ्यात धान्य उघड्यावर ठेवू नये. त्यामुळे त्यात ओलावा निर्माण होतो. धान्य उघड्यावर ठेवण्याऐवजी तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. त्यामुळे ओलाला आत जाण्यापासून रोखला जातो आणि कीड्यांपासून त्याचे संरक्षण होते.

लसूण वापरा

गहू साठवताना तुम्ही लसूण वापरू शकता. कीडकांपासून गव्हाचा बचाव करण्याचा हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. खरं तर लसणाचा तीव्र गंध कीड्यांना दूर ठेवण्यास मदत करतो.