Google for India च्या अनेक घोषणा; गुगल पेमध्ये नव्या फिचर्सची भर, तर युट्यूबवर आता…

गुगल आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच नवनवे प्रयोग करत असतो.

Google-For-India-_LEAD_NEW
Google for India च्या अनेक घोषणा; गुगल पेमध्ये नव्या फिचर्सची भर, तर युट्यूबवर आता…

गुगल आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच नवनवे प्रयोग करत असतो. गुगल फॉर इंडियानं भारतातील अब्जावधी लोकांना समोर ठेवत नव्या उत्पादनांची घोषणा केली आहे. गुगल पेमध्ये नव्या फिचर्सची भर केली आहे. शॉर्ट्स व्हिडिओंची लोकप्रियता पाहून यूट्यूबने अधिकृतपणे यूट्यूब शॉर्ट्स लॉन्च केले आहेत. यूट्यूब शॉर्ट्समध्ये वापरकर्ते आता ६० सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ तयार करू शकतील आणि कॉपीराइट मुक्त लाखो संगीत वापरू शकतील, असं गुगलने सांगितलं आहे. या कार्यक्रमात गुगलने गुगल क्लासरूमसह गुगल करिअर प्रमाणपत्राबाबत अनेक घोषणा केल्या आहेत.

  • Google Pay: गुगल पेद्वारे दरवर्षी १५०० कोटी रुपयांचे व्यवहार केले जात आहेत. गुगल पेवर आता एक स्प्लिट फीचर येत आहे. त्यात तुम्ही तुमचा खर्च गटांमध्ये विभागू शकता. २०२२ पासून Google Pay हिंग्लिशला (इंग्लिश+हिंदी) देखील सपोर्ट केले जाईल. याशिवाय, पुढील वर्षापासून, गुगल पेध्ये पैसे पाठवण्यासाठी खाते क्रमांक टाइप करण्याची गरज नाही. टाइप करण्याऐवजी, तुम्ही बोलून खाते क्रमांक जोडू शकता. गुगल पेला तुमचा दृष्टिकोन हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये समजेल. याशिवाय, माय शॉप फीचर देखील गुगल पेमध्ये उपलब्ध असेल, ज्याच्या मदतीने दुकानदार त्यांच्या दुकानाची यादी करू शकतील.

वनप्लस सीरिजचा नवा फोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला; जाणून घ्या वैशिष्ट्ये

  • Digital Certificate: गुगल इंडियाने डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. गुगलचेचे डिजिटल प्रमाणपत्र शुल्क ६ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत आहे. गुगलने या प्रमाणपत्रासाठी NASSCOM फाउंडेशन आणि टेक महिंद्रा यांच्याशी भागीदारी केली आहे आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमही जाहीर केला आहे.
  • Google Assistant: करोनाचं संकट पाहता लसीकरण कार्यक्रमासाठी गुगल असिस्टंटचा वापर करता येणार आहे. लसीकरणाच्या स्लॉट्सची उपलब्धता आता गुगल असिस्टंटद्वारे ट्रॅक केली जाऊ शकते. गुगल सहाय्यक तुमच्यासाठी लसीची नोंदणी करण्यास सक्षम असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Google has announced new features on search google pay and vaccination rmt

Next Story
इन्स्टाग्रामवर येणार दोन नवे फिचर्स; वापरकर्त्यांना रील्स बनवण्यासाठी होणार मदतinstagram-7593
ताज्या बातम्या