Ant Remedy Home Tips: उन्हाळा, हिवाळा असो किंवा पावसाळा; घरातल्या गोड पदार्थांवर मुंग्यांचा हल्ला सुरूच असतो. विशेषतः साखरेच्या डब्यात त्या इतक्या वेगाने घुसतात की एकदा आत गेल्या की मग त्यांना बाहेर काढणं म्हणजे डोकेदुखीचं काम. दररोज सकाळी चहा करताना साखरेसोबत मुंग्या दिसल्या की सगळ्यांचा मूडच खराब होतो. साखर वाया जाते, त्रास वाढतो आणि त्यावर उपाय काही सापडत नाही. बर्याच जणांनी महागडे स्प्रे, पावडर किंवा केमिकल वापरून पाहिले असतील; पण काही दिवसांनी पुन्हा तिथेच मुंग्यांचा मोर्चा. मग उपाय काय? उपाय आहे फक्त ५ रुपयांत. तुमच्या स्वयंपाकघरात किंवा जवळच्या पंसारीकडे (किराणा किंवा मसाले विकणारा दुकानदार) मिळणारी एक साधी वस्तू तुम्हाला या मुंग्यांच्या त्रासातून कायमची सुटका देऊ शकते.
ही भन्नाट ट्रिक सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतेय. हा उपाय इतका सोपा आहे की एकदा करून पाहिलात की तुम्हालाही वाटेल, “अरे हे आधी का नाही सुचलं!”
काय करायचं?
फक्त साखरेच्या डब्यात ही ५ रुपयांची वस्तू टाका आणि हलक्या हाताने साखरेत मिसळा. बस! डब्याचं झाकण घट्ट बंद करा आणि काही दिवसांतच जादू पाहा, मुंग्या पुन्हा कधी दिसणार नाहीत. जर डब्यात आधीपासून मुंग्या असतील तर आधी साखर काढून त्या पूर्णपणे काढून टाका. डबा स्वच्छ धुवून कोरडा करा, मग पुन्हा साखर भरा आणि त्यात या वस्तूच्या काही गोळ्या ठेवा. डबा मोठा असेल तर ३-४ तुकडेही ठेवू शकता.
पण नेमकं हे काम करतं कसं?
या वस्तूमध्ये असतो एक नैसर्गिक घटक यूजेनॉल (Eugenol), ज्याचा वास मुंग्यांना बिलकूल आवडत नाही. मुंग्या त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात. त्यांना अन्न, रस्ता आणि घर यांचा मागोवा हाच वास घेऊन मिळतो. पण, या वस्तूचा सुगंध इतका तीव्र असतो की त्यांचा हा ‘वासाचा सेन्स’ पूर्णपणे गोंधळून जातो. परिणामी, त्या साखरेच्या डब्याजवळ येतच नाहीत.
या उपायाचे फायदे
- हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे.
- कोणतेही केमिकल नाही, कोणताही खर्च नाही.
- ही वस्तू स्वस्त, सहज उपलब्ध आणि प्रभावी आहे.
- एकदा ठेवली की तिचा वास बराच काळ टिकतो, वारंवार बदलण्याची गरज नाही.
- फक्त साखरच नाही तर गूळ किंवा इतर गोड पदार्थांनाही मुंग्यांपासून वाचवण्यासाठी ते वापरता येते.
किचनमध्ये एखाद्या ठिकाणी मुंग्या वारंवार दिसतात का? तर तिथेही या वस्तूचे काही तुकडे ठेवा आणि त्या पळून जातील, कायमच्या!
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही ५ रुपयांची वस्तू नेमकी कोणती?
तर चला, रहस्य उलगडूया… ती वस्तू म्हणजे लवंग. हीच ती सुगंधी लवंग, जी आपण दररोज मसाल्यात वापरतो. तिचा वास मुंग्यांना सहन होत नाही आणि त्या तिला दूरूनच ओळखून पळ काढतात, म्हणून पुढच्या वेळी साखरेच्या डब्यात मुंग्या दिसल्या तर काही केमिकल नको, फक्त टाका काही लवंगा आणि त्यामुळे तुमची साखर मुंग्यांपासून खूप लांब ठेवू शकता.
(वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे)
