Green Apple VS Red Apple: अर्थपूर्ण आणि आरोग्यदायी फळांमध्ये सफरचंद हे सर्वांत लोकप्रिय फळ आहे. त्यांची चव ताजेपणाने भरलेली असते. विविध प्रकारे ते वापरता येते आणि आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. सफरचंद मुख्यतः हिरवे आणि लाल अशा दोन प्रकारांत मिळते. दोन्ही प्रकारांत जीवनसत्वे, अँटिऑक्सिडंट्स, आणि आहारातील तंतू मुबलक प्रमाणात असतात. जे हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया आणि एकूण तंदुरुस्ती सुधारतात. त्याशिवाय सफरचंदांमध्ये पॉलीफेनॉल्स असतात, जे जळजळ कमी करण्यासह मेंदूचे कार्य वाढवतात. तरीही हिरव्या आणि लाल अशी दोन्ही सफरचंदांमध्ये चव, रंग, पोषणमूल्य व स्वयंपाकातील उपयोग या बाबतीत फरक असतो. या फरकांमुळे आपल्याला पाहिजे त्या उद्देशासाठी योग्य प्रकार निवडता येतो.
हिरवे आणि लाल सफरचंद यातील फरक?
१. रंग आणि स्वरूप
हिरवे सफरचंद ग्रॅनी स्मिथ, उजळ हिरव्या रंगाचे असते. त्याचा आतील घट्ट असलेला भाग पांढरा असतो. त्याची कुरकुरीत पोत आणि हिरवा रंग यांमुळे हे सफरचंद ताजेतवाने दिसते. लाल सफरचंद रेड डेलिशियस किंवा फ्युजी, गडद लाल रंगाचे असते आणि त्याचा आतील मांसल भाग रसाळ व गोड असतो. लाल रंग अँथोसायनिन्सपासून येतो, जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आहेत आणि त्याचे आरोग्यादायी फायदे आहेत. लाल सफरचंद हिरव्या सफरचंदाइतके घट्ट नसते; परंतु त्याची चव आवड निर्माण करणारी असते.
२. चव
हिरवी सफरचंद आंबट आणि ताजे असतात. त्यामुळे ती स्वयंपाक, बेकिंग आणि ताजी असताना खाण्यासाठी परिपूर्ण असतात.लाल सफरचंद गोड आणि रसाळ असतात, ज्यामुळे ती थेट खाण्यास, सॅलडकिंवा स्मूदीसाठी उत्तम असतात. त्यांची नैसर्गिक गोडी अतिरिक्त साखरेची गरज कमी करते.
३. पोषण आणि आरोग्यासाठी मिळणारे फायदे:
दोन्ही प्रकारांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी व अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हिरवे सफरचंद कमी कॅलरी आणि कार्बोहायड्रेटसह वजन नियंत्रण आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातील पेक्टिन, विरघळणारे फायबर यांमुळे पचन सुधारते. लाल सफरचंदांमध्ये अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारतात.
४. रक्तशर्करेवर नियंत्रण:
हिरवे सफरचंद कमी साखरेसह फायबरने समृद्ध असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते. लाल सफरचंद थोडे गोड असले तरी त्यातील अँटीऑक्सिडंट्स जळजळ कमी करतात आणि कमी प्रमाणात सेवन केल्यास ग्लुकोज चयापचय सुधारतात.
५. वजन नियंत्रण:
हिरवी सफरचंद घट्ट आणि तंतुमय असतात, ज्यामुळे पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते. लाल सफरचंदे रसाळ आणि गोड असतात, ज्यामुळे ती आकर्षण निर्माण करतात आणि समाधानकारक नाश्त्यासाठी खाल्ली जातात.
६. स्वयंपाकातील वापर:
हिरवे सफरचंद पाई ( Bakery products pies ), सॉस व सॅलडसाठी उत्तम असतात. लाल सफरचंद सरळ, स्मूदी, ज्यूस किंवा फळांच्या प्लेटमध्ये खाण्यासाठी परिपूर्ण आहेत.
इतर फरक :
हिरव्या सफरचंदांमध्ये साखर कमी असते, पोत घट्ट असते, जास्त काळ टिकते आणि ते बेकिंगसाठी उत्तम असतात. लाल सफरचंदे गोड, रसाळ, अँथोसायनिनने समृद्ध असतात आणि ती ताजी खाण्यासाठी व पेयांसाठी योग्य असतात.
वजन नियंत्रण आणि रक्तशर्करा नियंत्रणासाठी हिरवी सफरचंदे उत्तम आहेत; तर लाल सफरचंदे गोड, रसाळ व अँटिऑक्सिडंट्समुळे एकूण तंदुरुस्ती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. दोन्ही प्रकारांचे संतुलित सेवन उत्तम ठरते.