Guru Purnima Puja Vidhi | गुरूपौर्णिमा पूजा विधी : आज देशभरात गुरूपौर्णिमा साजरी केली जात आहे. आषाढी पौर्णिमेलाच गुरूपौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात गुरूपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आजच्या दिवशी गंगा स्नान आणि दान यांचंही विशेष महत्व आहे. धर्मग्रंथानुसार वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे महर्षी वेद व्यास यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. यंदाच्या गुरुपौर्णिमेचा शुभ योग, मुहूर्त आणि पूजा पद्धती जाणून घ्या.

गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त २०२२-

गुरुपौर्णिमा १३ जुलै रोजी पहाटे ४ वाजतापासून ते दुसर्‍या दिवशी म्हणजेच १४ जुलै गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून ६ मिनीटांनी संपेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री १२:४५ पर्यंत इंद्र योग राहील. या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी ७.२० आहे. भद्रा सकाळी ५.३२ ते दुपारी २ वाजून ४ मिनीटांपर्यंत आहे. या दिवसाचा राहू काल दुपारी १२.२७ पासून २.१० पर्यंत आहे.

25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?

गुरुपौर्णिमेला बनतोय शुभ योग-

आषाढी पौर्णिमेला ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. यावेळी गुरु पौर्णिमेला गुरू, मंगळ, बुध आणि शनि यांच्या शुभ संयोगामुळे रुचक, शश, हंस आणि भद्रा योग तयार होत आहेत.

हेही वाचा – Guru Purnima 2022 : गुरु पौर्णिमेला आपल्या राशीनुसार करा ‘या’ वस्तूंचे दान; पूर्ण होतील सर्व मनोकामना

गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची-

ज्योतिषांच्या मते, गुरुपौर्णिमेला पानं, ओले नारळ, मोदक, कापूर, लवंग, वेलची यांची विधिवत पूजा केल्यास शंभर यज्ञांप्रमाणे फळ मिळते. या पुजेमुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असंही म्हणतात. पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. त्वचाविकार आणि दमा यासारखे आजार असणाऱ्यांनी आज पुजा करायला हवी, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी वैदिक मंत्रांचा जप आणि विष्णु सहस्रनामाचे पठण केल्याने गुरूंची विशेष कृपा होते असं मानलं जातं.

गुरुपौर्णिमेच्या रात्री खीर बनवून दान केल्याने मानसिक शांती मिळते. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र बलवान होतो. याज्ञवल्य ऋषींच्या वरदानाने वटवृक्षाला जीवनदान मिळाले होते, त्यामुळे गुरुपौर्णिमेलाही वटपूजा केली जाते.