Monsoon Hair Care Tips : कडक उन्हाच्या झळा सहन केल्यानंतर आता सर्वांना दिलासा देणाऱ्या मान्सूनला लवकरच सुरुवात होईल, या ऋतुमध्ये केवळ सर्दी, खोकला नाही तर केसांशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात अनेकांना केस गळतीची समस्या जाणवते, याशिवाय केसांमध्ये कोंडा, टाळूवर खाज सुटणे, केस खराब होणे आणि इन्फेक्शन होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत केसांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे टाळूवर कोंडा होण्यास सुरुवात होते. यामुळे टाळूवर खाज येते. टाळूवर जास्त प्रमाणात सेबम जमा झाल्यास केस कमकुवत होतात आणि केसगळतीची समस्या वाढते. यामुळे पावसाळ्यात केसांसंबंधित समस्या कशा टाळायच्या आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत स्किनक्राफ्ट लॅबोरेटरीजचे सह-संस्थापक आणि सीईओ चैतन्य नालन यांनी सांगितले की, सेबम आणि मृत त्वचेचे मिश्रण फॉलिकल्समध्ये तयार होते यामुळे तुमच्या स्कॅल्पमध्ये बॅक्टेरिया वाढीस चालना मिळते. यामुळे टाळूला खाज सुटणे, केसांमधून दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या जाणवतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair care tips ways to maintain a clean and problem free scalp during monsoon sjr
First published on: 31-05-2023 at 11:20 IST