Hair Care Tips : पावसाळा ऋतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. विशेषत: मुलींना या ऋतूचा मनमोकळा आनंद घ्यायचा असतो. पण यासोबतच त्यांना त्यांच्या केसांची आणि त्वचेची चिंता देखील असते. कारण पावसात केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.आपण आपल्या त्वचेची जितकी काळजी घेतो तितकीच केसांची काळजी घेतली पाहिजे. केसांना निरोगी बनवायचे असेल तर त्यासाठी घाम येण्यापासून वाचवणे, त्यांना नीट तेल लावणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे केस गळण्याची समस्या कमी करता येईल. नियमित काळजी घेतली तर केस मजबूत आणि सुंदर होऊ शकतात. केस बांधल्यावर की मोकळे सोडल्यावर जास्त तुटतात, असा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनात असतो. चला त्याचं उत्तर जाणून घेऊया.

केस बांधून ठेवायचे की मोकळे सोडायचे?

अनेक महिलांना त्यांचे केस मोकळे ठेवायला आवडतात तर काहींना ते बांधून ठेवायला आवडतात. मात्र, केस मोकळे ठेवल्याने तुटण्याची समस्या वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच रात्री झोपताना केस बांधण्याचा केस बांधण्याचा सल्ला दिला जातो.अनेक महिला अशी तक्रार की रात्री केस मोकळे सोडून झोपल्यानं सकाळी केस खूप तुटतात, तर बांधून झोपलं की कमी तुटतात.

केस बांधण्याचे काय फायदे आहेत

केस बांधून ठेवल्याने ते कमी तुटतात. केस मोकळे ठेवल्यास त्यांचा कोरडेपणा वाढतो. केस मोकळे ठेवून झोपला की त्याचा सगळा ओलावा उशीला लागतो. त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. अशा स्थितीत सकाळी उठल्यावर प्रत्येक ठिकाणी फक्त केसच दिसतात. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार केस बांधून झोपावे.

केसांची चमक वाढते

रात्री झोपताना केस विंचरु नये असे सांगितले जाते, पण रात्री केस विंचरून झोपल्यानं केसांचं काहीही नुकसान होत नाही. केसातील गुंता काढल्यावर केस कमी गळतात, त्यामुळे केस विंचरुन झोपलो तर केसांना लावलेले तेल वरपासून खालपर्यंत पोहोचते. यामुळे केसांना पोषणही मिळते.

हेही वाचा – प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? तज्ज्ञ सांगतात ‘तूप’ खा, जाणून घ्या रोज किती चमचे तूप खावं?

केस रेशमी राहतील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री झोपताना आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा केसांना तेल लावून मसाज करा. केसांना तेल लावून मसाज केल्याने स्काल्पमध्ये रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे केसांना आवश्यक ते सर्व पोषक तत्व मिळतात. केसांना मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे ताणही कमी होतो. केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. केस धुतल्यानंतर केस सिल्की आणि शाईन करतील. मात्र, हे लक्षात ठेवा की केस जास्त घट्ट बांधू नका, थोडे सैल ठेवा.