Happy New Year 2022 Horoscope: शनिवारपासून नवीन वर्ष सुरू होत आहे. वर्षाच्या सुरुवातीला सूर्य धनु राशीत आणि चंद्र वृश्चिक राशीत असेल. नवीन वर्ष त्याच्यासाठी छान जावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्ष अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ शकते. पण प्रामुख्याने हे वर्ष ४ राशीच्या लोकांसाठी सर्वात खास असेल. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी. वृषभ (Taurus) या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष सर्वात खास असेल. या वर्षी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल अशी अपेक्षा आहे. पैसे मिळण्याची अनेक शक्यता असतील. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची आशा आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमवू शकाल. प्रेमसंबंधित बाबींसाठीही नवीन वर्ष अनुकूल राहण्याची शक्यता आहे. (हे ही वाचा: २०२२ मध्ये ‘या’ ४ राशींचे भाग्य बदलू शकते, धनाची देवता कुबेरची असेल विशेष कृपा!) सिंह (Leo) नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुमची रखडलेली कामे या वर्षी पूर्ण होतील. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा मिळेल. वाहन सुखही या वर्षी मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठीही हे वर्ष उत्तम राहील. एकंदरीत २०२२ ची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे. (हे ही वाचा: ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ ४ राशींचे पुरुष आपल्या पत्नीवर करतात खूप प्रेम!) तूळ (Libra) नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी छान राहील. या वर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. वर्षभर धनप्राप्तीचे योग होत राहतील. जानेवारी २०२२ मध्ये तुमच्यासमोर चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. या वर्षात तुम्ही चांगले पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. (हे ही वाचा: Shani Gochar 2022: नवीन वर्षात ‘या’ राशींवर होऊ शकते शनिदेवाची कृपा!) धनु (Scorpio) नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगले आहे. या वर्षी तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल. बॉस तुमच्या कामावर खूश होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल. पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. हे वर्ष लव्ह लाईफसाठीही शुभ आहे. (येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)