Happy Teddy Day: व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस हा टेडी डे म्हणून साजरा करतात. या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना प्रेमाने टेडी बियर भेट देतात. १० फेब्रुवारीला टेडी डेच्या दिवशी जोडीदारांना टेडी देताना ते त्यांचे प्रेमही व्यक्त करतात. अशा स्थितीत या दिवशी बाजारात रंगीबेरंगी टेडी बेअरला खूप मागणी असते. यासोबतच लोक या दिवशी आपल्या सोबत्यांना प्रेमळ संदेश आणि शेरो-शायरी देखील आवर्जून पाठवतात. यासाठीचं काही खास संदेश, शुभेच्छा मेसेज देत आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
१.
मन करतं की
तुला माझ्या मिठीत घेऊ
तुला टेडी बेअर बनवून
नेहमी सोबत ठेवू
२.
तो टेडी जो आमचा आहे… त्याच्यासाठी एक गोंडस छोटा टेडी
३.
शुभ दिवस गोड दिवस, टेडीशिवाय करू नको साजरा
४.
जर तु टेडी असतीस,
तर माझ्याकडेच ठेवलं असतं,
स्वतःच्या खिशात ठेवत
तुला नेहमी सोबत घेऊन गेलो असतो
५.
मी प्रेमाने पाठवत आहे टेडी,
सांभाळून ठेव तू
प्रेम असेल तर पाठवं
मलाही एक टेडी प्रेमाने
हॅप्पी टेडी डे!
(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोमध्ये हृदयाच्या आकाराचा फुगा कुठे आहे?)
६.
निमित्त आहे टेडी डेचे,
मग स्वतःला का थांबवलं आहे,
जा आणि द्या टेडी तुमच्या प्रेमाला
टेडी डे च्या दिवसाला!
७.
आजकाल प्रत्येक टेडी पाहून हसू येतं,
कसं सांगू तुला…
प्रत्येक टेडीमध्ये मी तुला पाहतो.
हॅप्पी टेडी डे!
(हे ही वाचा: Happy Chocolate Day 2022: व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या ‘चॉकलेट डे’चा रंजक इतिहास माहितेय का?)
८.
चॉकलेटचा सुगंध, आईस्क्रीमचा गोडवा, प्रेमाची मजा आणि हातांची चव, हास्याचे फुगे आणि तुझी साथ, देतो तुला ‘टेडी डे’च्या शुभेच्छा!
९.तुझ्यावर प्रेम दाखवायचं आहे,
मनापासून निभावायचं आहे,
शेवटी, हे ठरवलं आहे की,
तुला टेडी पाठवून व्यक्त होणार आहे.
१०.
आपण नेहमी जवळ असू शकत नाही
म्हणून एक टेडी माझासाठी आण,
नेहमी जवळ ठेवेलं
तुझा प्रेमाचा हा नजराणा