Health Benefits Of Camphor:  पूजेच्या वेळी आरती करताना कापूर प्रामुख्याने वापरला जातो. पूजेच्या ताटात तुम्ही कापराचा वापर अनेकदा केला असेलच. पण कापराचा केवळ देवापुढे दिवा लावण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी कारणांसाठीही केला जातो हे अनेकांना माहीत नसतं. जास्त करून लोक कापूराचा वापर पूजेत जाळण्यासाठीच करतात. पण कापूरात अनेक औषधी गुण असतात हे अनेकांना माहितच नाही. यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. चला तर पाहूया २ रुपयाच्या कापूराचे चमत्कारिक फायदे.

मंदिरे, घराघरांत किंवा धार्मिक उत्सवांत आरतीवेळी हमखास कापूर लावला जातो. अनेक औषधी गुणधर्म असलेला, प्रदूषण कमी करणारा, नकारात्मकता घालवून सकारात्मक वातावरण तयार करणारा हा कापूर आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे.

(हे ही वाचा : चालता-बोलता धाप लागते, थकवा येतो? हृदयाचं रक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या क्लुप्त्या वाचा! )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कापूरचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितेय का?

  • खोबऱ्याच्या तेलात कापूर टाकून केसांना लावल्यास केस गळणे कमी होते. 
  • पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशावेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.
  • खोकला झाल्यास कापूर आणि मोहरी किंवा तेलाचे तेल मिसळून थोडा वेळ ठेवा. नंतर या तेलाने पाठ आणि छातीवर हलकेच चोळा. यामुळे बराच फायदा होतो.
  • खोकला झाल्यास कापूर आणि मोहरी किंवा तेलाचे तेल मिसळून थोडा वेळ ठेवा. नंतर या तेलाने पाठ आणि छातीवर हलकेच चोळा. यामुळे बराच फायदा होतो.
  • केसांच्या अनेक समस्या या कापराच्या वापराने कमी होऊ शकतात. नारळाच्या तेलात कापूर मिसळून रोज केसांना लावले तर केसातील कोंढा कमी होण्यास मदत होते. 
  • नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने स्नायू दुखणे आणि पेटके येण्यापासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त, ते सूज कमी करण्यासाठी देखील कार्य करू शकते. 
  • डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे आणि सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होतो. कापूरच्या फायद्यामुळे डोकेदुखी दूर होऊ शकते. 
  • मुरुमांसारख्या त्वचेच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी कापूर वापरला जातो. 

(वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)