ओला मसाला विकत घेताना त्यात आल्याचे एखाद-दोन तुकडे हमखास असतात. गृहिणी आल्याचा वापर सर्रास लसणीसोबत करतात. आल-लसणाची पेस्ट असली की पदार्थाची चवही वाढते. पण जेवणाची चव वाढवण्यापेक्षाही काही उपयोगी गुणधर्म आल्याचे आहे जे हळूहळू आपण विसरत चाललो आहोत. पूर्वी आजीच्या बटव्यात आल्याला विशेष स्थान होतं. सर्दी खोकला झाला की हमखास आल्याचा उपयोग केला जायचा. पण हल्ली सर्दी खोकल्यावर औषध बाजारात मिळू लागल्याने आल्याचं महत्त्व कमी होऊ लागलं पण असं असलं तरी आल्याच्या गुणधर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचे फायदे हे प्रत्येक गृहिणीला माहिती असलेच पाहिजे.

सावधान! फ्रिजमधील थंडगार पाणी पिताय?

१) महिनाभरात थंडी सुरू होईल, थंडीच्या काळात आलं फारच फायदेशीर असते. थंडीत शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आल्याच्या रसाचा उपयोग होऊ शकतो. चमचाभर आल्याचा किस घेऊन तो दोन कप पाण्यात घालून उकळून घ्यावा. साधारणतः दहा मिनिटे उकळून हे पाणी थंड करुन घ्यावे. त्यात मधाचे काही थेंब टाकावेत हे पाणी दिवसभरात तीन-चार वेळा घेतल्यानंतर शरीर उष्ण ठेवण्यासाठी मदत होते.
२) आल्याच्या तुकड्याला साधे किंवा सैंधव मीठ लावून जेवणापूर्वी ते खाल्यास तोंडाची गेलेली चव परत येते.
३) चांगली भूक लागण्यासाठीदेखील वरील उपाय करुन पाहू शकता.
४) सर्दी-सायनस असो किंवा पित्ताने डोकेदुखी असो, आले ठेचून त्याचा चोथा कपाळावर घासावा किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा. थोडी आग होते, पण लगेच डोके उतरते.

‘हे’ आहेत चिकू खाण्याचे फायदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) सतत खोकला येत असेल किंवा दम लागला असेल तर एक चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध घालून सावकाश चाटण करावे आणि गरम पाणी प्यावे, खोकला थांबतो.
६) पोटदुखी, अपचन, अजीर्ण, ओकारी, मळमळ, पोट डब्ब होणे या सर्व तक्रारींसाठी आले रस+लिंबूरस+सैंधव मीठ यांपासून बनविलेले ‘पाचक’ दिवसभरात २/२ चमचे तीन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावे.
७ ) अंग थरथरते, दातखीळ बसते, अंग गार पडते यासाठी लगेच आल्याचा तुकडा चघळल्यास फायदेशीर ठरेल.
८) थंडीच्या दिवसात पाय गरम ठेवण्यासाठी आल्याचा रस पाण्यात उकळून त्याने पायाला मसाज केल्यास लगेच आराम पडतो.