सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत, या दिवसांमध्ये अनेकांना अंघोळ करावीशी वाटत नाही. मात्र, दररोज अंघोळ करणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचं म्हटलं जात. त्यामुळे अनेकजण मनात नसतानाही अंघोळ करतात. पण ज्यांना रोज अंघोळ करणं आवडत नाही किंवा ज्यांना अंघोळीचा कंटाळा येतो. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे विज्ञानदेखील दररोज अंघोळ करणं आरोग्यासाठी चांगल नसल्याचं म्हणत आहे.

कोणताही ऋतू असो आपण रोज अंघोळ करतो. कारण आपल्याला लहानपणापासूनच सांगितले जातं की, रोज अंघोळ करणे ही एक चांगली सवय आहे आणि ती आपल्याला ताजेतवाने ठेवते. याशिवाय अंघोळचे इतरही अनेक फायदे असतात. तर अंघोळ केल्यावर जो ताजेपणा जाणवतो तो इतर कोणत्याही गोष्टीतून जाणवत नाही. मात्र, विज्ञान अंगोळीबाबत काही वेगळेच मानते. रोज अंघोळीची ही सवय विज्ञान चांगली का मानत नाही ते जाणून घेऊया.

त्वचेची क्षमता –

हेही पाहा- तुम्हीही हेअर सीरम वापरता का? हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी त्याचा वापर कसा करावा जाणून घ्या

रोज अंघोळ केल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते असं विज्ञानाचे म्हणणं आहे. जगभरातील त्वचातज्ञ म्हणतात की, थंडीत दररोज आंघोळ न करणे चांगले आहे, यामुळे आपली त्वचा सुरक्षित राहील. कारण, अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता चांगली असते. तुम्हाला जर दररोज घाम येत नसेल, धूळ आणि मातीशी तुमचा संबंध येत नसेल, तर दररोज आंघोळ करणे आवश्यक नाही.

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे तोटे –

हिवाळ्यात आपणाला गरम पाण्याने अंघोळ करण आवडतं. मात्र, जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराचे नुकसान होते. कारण, गरम पाण्यामुळे शरीरातील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते. नैसर्गिक तेल शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरात ओलावा ठेवण्यासाठी ते महत्वाचे काम करते.

त्वचेच्या संसर्ग –

हेही पाहा- तुम्हीही झोपेत दात चावता का? हे असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण, वेळीच ओळखा

कोलंबिया विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञांच्या मते, “दररोज अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि कमकुवत होते. त्यामुळे संसर्गाचा धोका झपाट्याने वाढतो.”

नखांसाठी हानिकारक –

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणं हे नखांसाठी हानिकारक मानलं जाते. कारण, नखे पाणी शोषून घेतात, ज्यामुळे ती मऊ होतात आणि तुटतात. त्याच वेळी, शिवाय नैसर्गिक तेल गेल्यामुळे ते नखं कमकुवत होऊ लागतात. गरम पाण्यामुळे त्यांची नैसर्गिक चमक कमी होतो.

…म्हणून दररोज अंघोळ गरजेची –

हेही वाचा- नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढवेल ‘हा’ चिकट पदार्थ; वेळीच जाणून घ्या खाण्याचे ‘हे’ योग्य प्रमाण

अंघोळीची सवय माणसाची मनःस्थिती, तापमान, हवामान आणि सामाजिक वातावरणावर अधिक अवलंबून असते. आपल्या देशात धार्मिक कारणांमुळे अंघोळ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय अनेक ठीकाणी पाण्याची कमतरता भासत नाही. आपल्या देशात अनेक वेळा सामाजाच्या काही नियमांमुळे दररोज अंघोळ करण गरजेच झालं आहे.

अंघोळ करण्यात भारतीय आघाडीवर-

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारत, जपान आणि इंडोनेशियाचे लोक अंघोळीच्या बाबतीत जगात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, दररोज आंघोळ केल्याने केवळ पाण्याचा अपव्यय होत नाही तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासही नुकसान होण्याची शक्यता असते.