शरीरातील सर्व अवयवांना हृदयाद्वारे रक्तपुरवठा केला जातो, त्यामुळे निरोगी राहण्यासाठी हृदयाचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक असते. आजकाल बदललेली जीवनशैली, तणाव, जेवणाच्या चुकीच्या सवयी त्यात जंकफूडचा समावेश, लठ्ठपणा अशा काही कारणांमुळे हृदयाचे विकार होतात. तसेच या कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढले आहे. अगदी तरुण मंडळींनाही या आजाराने ग्रासले आहे. आपण या आजाराला बळी पडू नये यासाठी सर्वांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांचे घर आणि कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांनाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

महिलांना हृदयविकार झटका येण्याआधी कोणती लक्षण दिसतात यावर एक अभ्यास (स्टडी) करण्यात आला. जर्नल सर्क्युलेशनमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासातून महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणती लक्षणं दिसतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अभ्यासामध्ये ५०० महिलांना सहभागी करण्यात आले, या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती, त्यावरचा औषधोपचार सुरू होता. या अभ्यासात समाविष्ट झालेल्या महिलांनी त्यांना एक महिना आधीपासून कोणता त्रास होत होता, हे सांगितले. त्यानुसार महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी कोणती लक्षणं दिसतात जाणून घ्या.

Money Mantra, instant loan, instant loan from the app , app instant loan, care while taking instant loan, Interest rate, cibil score, data privacy, private data, blackmail, instant loan care, marathi news,
Money Mantra: अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताना, काय काळजी घ्याल?
hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत

Health Tips : ‘या’ खाद्यपदार्थांमुळे वाढतो Type 2 Diabetes होण्याचा धोका

या अभ्यासानुसार हृदयविकाराचा झटका येण्याआधी महिलांमध्ये दिसतात ही लक्षणं

थकवा, अस्वस्थ वाटणे, श्वास घेण्यास अडचण येणे, तणाव, अपचन, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, हातामध्ये कमजोरी वाढणे, विचार करण्याच्या सवयी मध्ये बदल होणे, दृष्टीमध्ये बदल होणे, भूक न लागणे, मुंग्या येणे, रात्री श्वास घेण्यास अडचण येणे इ.

हृदयविकाराच्या झटक्याने दरवर्षी १.७ कोटी व्यक्तींचा मृत्यू होतो
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्याने दरवर्षी १ कोटी ७० लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. हृदयविकाराचा आजार असणाऱ्यांचा प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक यांमुळे मृत्यू होतो. हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी दिसणारी लक्षणं ओळखता न आल्याने अकेकांना योग्य उपचार घेण्यास उशीर होतो आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.

Health Tips : जेवणात मिठाचे प्रमाण वाढल्यास होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, याचे प्रमाण किती असावे जाणून घ्या

हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी अशी घ्या स्वतःची काळजी
कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब नेहमी नियंत्रणात राहील याची काळजी घ्या. तसेच कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ खाणे टाळा. लठ्ठपणा, जेवणातील जंकफूडचा समावेश यांमुळे तसेच धूम्रपान, मद्यपान अशा सवयींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अशा आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो.