scorecardresearch

Premium

जगातील सर्वात तिखट मिरचीचे चिप्स खाल्ल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; ही मिरची शरीरावर नेमकी कशी वार करते? जाणून घ्या

१४ वर्षांच्या मुलाचा जगातील सर्वात तिखट मिरचीपासून बनवलेल्या मसालेदार टॉर्टिला चिप्स खाल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे.

14 year-old dies spicy chip
चिप्स खाल्ल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू. (Photo : Freepik)

सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ती म्हणजे अमेरिकेतील एका १४ वर्षांच्या मुलाचा कॅरोलिना रीपर आणि नागा वायपर या जगातील दोन सर्वात तिखट मिरचीपासून बनवलेल्या मसालेदार टॉर्टिला चिप्स खाल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे. ज्या ‘वन चिप चॅलेंज’ या ब्रँड नावाखाली देशात विकल्या जातात. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, मॅसॅच्युसेट्समधील हॅरिस वोलोबाच्या मृत्यूनंतर eBay आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्या साइटवरून चिप्स काढून टाकले आहेत.

सायन्स अलर्टने सांगितलं आहे की, हे उत्पादन लाल कवटीने सजवलेल्या शवपेटीच्या आकाराच्या बॉक्समध्ये येते आणि त्यामध्ये वैद्यकीय परिस्थिती आणि गर्भवती महिलांसाठी चेतावणीदेखील दिली जाते. आउटलेटने सांगितले की, १४ वर्षांचा एक किशोरवयीन मुलगा ज्याला कोणतीही वैद्यकीय समस्या नव्हती. मात्र, टॉर्टिला चिप्स खाल्ल्यानंतर लगेचच मुलाला त्रास होऊ लागला आणि त्याने शाळेतील नर्सला पोटदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितलं. मुलाला त्रास होत असल्यामुळे त्याला घरी पाठवण्यात आले. परंतु, थोड्याच वेळात मुलाचा मृत्यू झाला.

Shortage of pulses and the challenge of food inflation
Money Mantra : क कमॉडिटीचा : कडधान्य व्यापाऱ्यांची ‘ऐशीतैशी’; आत्मनिर्भरतेचा चंग
KEM Hospital
लग्नानंतर आठ वर्षांनी गरोदर राहिलेल्या महिलेला पक्षाघाताचा झटका; केईएमच्या डॉक्टरांनी अशी केली गुंतागुंतीची प्रसूती
throws puppy noida
संतापजनक! सात वर्षांच्या मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला २० फुटावरून फेकलं, FIR नंतर रहिवाशांचे आंदोलन
A Young Woman Shares Her Breast Cancer Journey
World Cancer Day 2024 : ऑपरेशन, केमोथेरपी, न संपणाऱ्या वेदना अन् नवऱ्याची साथ…, कर्करोगाला हरवलेल्या तरुणीची कहाणी

हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये तीन यंत्रणा कार्यरत असू शकतात, ज्यांची यापूर्वीही नोंद झाली आहे. “जेव्हा अशा सोशल मीडिया आव्हानांचा विचार केला जातो, तेव्हा बरेचदा ती वाचण्यात अपयशी ठरतात. मुलांच्या बाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.”

हेही वाचा- तुम्ही रोज काजू, बदाम, मनुक्यासारखा सुकामेवा खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे

तसेच मसालेदार अन्न हे सहसा मृत्यूचे कारण बनत नाही. परंतु, जास्त मसालेदार पदार्थांमुळे अस्वस्थता, पचनसंस्थेत अडचण येऊ शकते किंवा क्वचित प्रसंगी, गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात, ज्यांनी आधीच काही संवेदनशीलता अनुभवली आहे अशा लोकांमध्ये ते घातक ठरू शकते, असे विभाग प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. अमित मित्तल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, सनार इंटरनॅशनल हॉस्पिटल यांनी सांगितले.

डॉ. कुमार यांच्या मते, यामध्ये तीन यंत्रणांचा सहभाग असू शकतो. एक तर कॅप्सेसिनची ऍलर्जी जे सर्व मसालेदार मिरचीमध्ये असलेले रसायन आहे किंवा हे हृदय किंवा मेंदू आणि धमन्यांचा एक व्हॅसोस्पाझम (अरुंद होण्याचे) एक प्रकरण आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो किंवा अनुक्रमे रिव्हर्सिबल सेरेब्रल व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन सिंड्रोम (RCVS) होतो; तर Indianexpress.com ला सांगितले की, RCVS हे मेंदूतील धमन्यांच्या अनेक संकुचिततेमुळे होते. परिणामी, स्ट्रोकसारखी वैद्यकीय स्थिती निर्माण होते, जी सुदैवाने त्वरीत आणि वेळेवर उपचार सुरू केल्यास पूर्ववत करता येते.

हेही वाचा- ‘या’ घरगुती तेलाने वाढतं चांगलं कोलेस्ट्रॉल? हृदयाचा फायदा होतो का, रोज किती व कसे करावे सेवन?

परंतु, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत या प्रकरणावर भाष्य करणे शक्य नसले तरीही अशा मसालेदार किंवा विषारी पदार्थांच्या सेवनाने तीव्र अॅनाफिलेक्सिस होऊ शकतो, ज्यामुळे अचानक धाप लागणे आणि घरघर येणे अशी लक्षणे उद्भवू शकतात. शिवाय आपत्कालीन उपचार उपलब्ध नसल्यास काही मिनिटांत त्वरित मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलांच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचंही डॉ. कुमार म्हणाले.

डॉ. मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, जास्त मसालेदार अन्न इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा मूळव्याधसारख्या परिस्थिती असलेल्या व्यक्तींचे आरोग्य बिघडवू शकतात. “मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तोंड आणि घशाची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच या अन्न निर्जलीकरणाचे कारणदेखील बनू शकते, ज्यामुळे घाम वाढू शकतो आणि तहान लागण्याची भावना होऊ शकते. परिणामी, मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात सेवन करणे तुमच्या वैयक्तिक सहनशीलतेबद्दल जागरूक असण्याचे लक्षण आहे. तसेच यासाठी तुमच्या आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचंही डॉ. मित्तल म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 year old dies after eating tortilla chip made with hottest peppers in the world news goes viral jap

First published on: 13-09-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×