Drugs Fail in Quality Test : सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एक धक्कादायक माहिती दिली आहे. भारतात नियमित वापरली जातात अशी तब्बल ४८ औषधं ही गुणवत्ता चाचणीत नापास झाली असल्याचं सीडीएससीओच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. यामध्ये अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटॅमिन्स ते रक्तादाबावर घेतली जाणारी वेगवेगळी औषधं आहेत. या ड्रग सेफ्टी अलर्टमध्ये कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, मल्टीव्हिटॅमिन्स, अँटीबायोटिक्स, अँटी-डायबेटिक आणि कार्डिओव्हस्कुलर यासह अनेक नियमित वापरल्या जाणार्‍या औषधांचा दर्जा उत्तम नसल्याचं आणि ही औषधं चाचणीत अपयशी ठरल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

सीसीएससीओने मार्च महिन्यात एकूण १४९७ औषंदांचे नमुने तपासले. त्यापैकी ४८ औषधं गुनवत्ता चाचणीत नापास झाली. या यादीत औषधे, वैद्यकीय उपकरणं आणि सौंदर्यप्रसाधनांचा देखील समावेश आहे, जी एकतर उत्तम दर्जाची नाहीत किंवा बनावट किंवा भेसळयुक्त आहेत.

यामध्ये एपिलेप्सी ड्रग गॅबापेंटिन, उच्च रक्तदाबावरील औषध टेल्मिसर्टन, मधुमेहावील औषध कॉम्बिनेशन ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन आणि एचआयव्ही ड्रग रितोनवीर यांसारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या औषधांचा यात समावेश आहे. उच्च रक्तदाब असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात घेत असलेल्या टेल्मा, टेल्मिसर्टन आणि अ‍ॅम्लोडिपाईन या औषधांचाही यात समावेश आहे.

CDSCO च्या अहवालानुसार, या औषधांमध्ये लायकोपेने मिनरल सिरप सारखी औषधंदेखील आहेत. तसेच इतर नियमित घेतल्या जाणार्‍या औषधांमध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, प्रोबायोटिक्स आणि अनेक मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांच्याही समावेश होतो. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक अ‍ॅसिड आणि नियासीनामाइड इंजेक्शन्सचाही समावेश आहे.

हे ही वाचा >> Summer health tips: उन्हाळ्यात नाकातून रक्त का येतं? घाबरू नका; हे घरगुती उपाय ट्राय करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फॉलिक अ‍ॅसिड इंजेक्शन, अल्बेंडाजोल, निकोटिनमाइड इंजेक्शन, एमोक्सनोल प्लस आणि अलसिफ्लोक्ससारखी औषधं यात आहेत. ही औषधं व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, अ‍ॅसिड नियंत्रण आणि फंगल इन्फेक्शनवर घेतली जातात.