वाढत्या वयाबरोबरच मानवी शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या ३० वर्षांनंतर अशी परिस्थिती असते, जेथे तुमचे करिअर, कुटुंब यांमध्ये एक स्थिरता आलेली असते. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीत अनेक बदल होत असतात. अशा वेळी पुढील काही गोष्टींकडे लक्ष द्यावे. तिशीनंतर दीर्घकालीन मेंदूच्या आरोग्याचा पाया रचण्यासाठी एक महत्त्वाचा काळ आहे आणि आता सोपे निर्णय घेतल्यास नंतर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखिजा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. प्रशांत मखिजा सांगतात की, ३० या वयात मेंदूला तुमच्या शरीराइतकीच काळजी घेण्याची आवश्यकता असते.
आहारातील विविधता
बंगलोरच्या आर. आर. नगर येथील एस. एस. स्पर्श रुग्णालयातील सल्लागार व न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिवकुमार एचआर म्हणाले की, मेंदूची भरभराट ओमेगा ३ फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम, कोएंझाइम क्यू व व्हिटॅमिन डी यांसारख्या पोषक घटकांवर होते, ज्यांची आहारात अनेकदा कमतरता असते. “हे पोषक घटक केवळ स्मरणशक्तीसाठी फायदेशीर ठरत नाहीत, तर मूड नियंत्रित करण्यात आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यातदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्याशिवाय लोक चिंता आणि विसरणे यांसारख्या आजारांना बळी पडतात”, असे डॉ. शिवकुमार म्हणाले. त्यामुळे डिजिटल उपकरणांपासून दूर राहणे आणि शांततेत वेळ घालविणे गरजेचे आहे.
शारीरिक, मानसिक व भावनिक तंदुरुस्ती
प्रजनन वय आणि प्री-मेनोपॉजदरम्यान हार्मोनल बदलदेखील सुरू होतात आणि ते स्मरणशक्ती, मनःस्थिती व एकाग्रतेवर परिणाम करू शकतात.
“नियमित व्यायाम आणि ताकद प्रशिक्षण मेंदूतील रक्ताभिसरण सुधारून आणि संप्रेरक पातळी स्थिर करून या परिणामांना दूर करण्यास मदत करेल,” असे डॉ. शिवकुमार म्हणाले. डॉ. मखिजा यांनी सहमती दर्शविली आणि सांगितले की, शारीरिक हालचाली केवळ तुमचे शरीरच घडवत नाहीत, तर त्यामुळे मूड सुधारतो, स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूच्या नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
मानसिक तंदुरुस्तीदेखील तितकीच महत्त्वाची आहे आणि जर्नलिंग, योगा व ध्यान यांसारख्या सवयी भावनिक लवचिकता आणि स्पष्टता निर्माण करण्यास मदत करू शकतात. डॉ. मखिजा म्हणाले की, एखाद्याने त्यांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. कारण- दीर्घकालीन ताणतणावामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि तुमचा मेंदू संकुचित होतो. “माइंडफुलनेस, जर्नलिंग किंवा अगदी थेरपी तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा,” डॉ. मखिजा म्हणाले.
झोप
“झोपेबद्दल गांभीर्याने” विचार करायला हवा. “गहन विश्रांती म्हणजे जेव्हा तुमचा मेंदू वाईट आठवणी काढून टाकतो, चांगल्या आठवणींना बळकटी देतो आणि मेंदूला पुन्हा जागृत करतो. तुमचे वयाचे तिशीचे दशक हे पुढील दशकांसाठी एक मजबूत संज्ञानात्मक पाया रचण्यासाठी योग्य काळ आहे,” असे डॉ. मखिजा म्हणाले. वय वाढत असताना, सामाजिकरीत्या व्यग्र राहिल्याने आपल्याला एकाकीपणा, मानसिक ताण आणि अगदी वाईट आठवणी कमी होण्यास मदत होईल,” असे डॉ. शिवकुमार म्हणाले.