Wrong Food Combination : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आहार घेताना फूड कॉम्बिनेशन चुकतं आणि शारीरीक समस्या निर्माण होतात. फळांसोबत काय खायला पाहिजे आणि काय खाऊ नये, याबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक असते. त्यामुळे फळांचं सेवन करताना नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. फॅट टू स्लिमचे डायरेक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फळांसोबत काही खाद्यपदार्थांचं सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहचू शकते. यामुळे तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते. तसेच आरोग्याच्या अन्य गंभीर समस्यांनाही सामोर जावं लागू शकतं. त्यामुळे जाणून घेऊयात फळांसोबत कोणते पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

संत्र्यासोबत गाजर खाऊ नका

गाजर आमि संत्र्यांचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतं. जर तुम्हाला ज्यूस प्यायला आवडत असेल. तर संत्र्याच्या ज्यूसमध्ये गाजराचे ज्यूस मिक्स करु नका. एक्सपर्ट सांगतात की, तुम्हाला याच्या सेवनामुळं हीटबर्नची समस्या होऊ शकते. तसंच किडनी खराब होण्याचा धोकाही संभवतो.

पपई आणि लिंबू

अनेक लोकांना फळांवर लिंबू मारून खाणं पसंत असतं. पण पपईवर लिंबू शिंपडल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पपई आणि लिंबू एक घातक संयोजन आहे. ज्यामुळं एनीमिया आणि हीमोग्लोबिन मध्ये संतूलन राहण्यास अडथळा निर्माण होतो.

नक्की वाचा – त्वचा सुंदर आणि मुलायम ठेवायचीय? ही पाच फळे खाल्ल्यावर त्वचा होऊ शकते तजेलदार

पेरु आणि केळा

काही लोकांना फ्रूट चाट खाणं पसंत असतं. फ्रूट चाटमध्ये पेरू आणि केळ्याचा समावेश असतो. पण हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. हे दोन्ही फळं एकत्र खाल्ल्याने अॅसिडोसिस,मतली, गॅस आणि सतत डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.

फळांसोबत भाज्या

फळांना आणि भाज्यांना कधीही एकत्र मिक्स करु नये. फळांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं आणि ते पचायला कठीण जातं. फळांसोबत भाज्यांचे सेवन केल्यात पोटात विषाक्त पदार्थ निर्माण होतात. ज्यामुळे दस्त, डोकेदुखी, संक्रमण आणि पोटदुखी होऊ शकते.

संत्र आणि दूध

दूध आणि संत्र्याच्या मिश्रणाचे सेवन केल्यास पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. संत्र्यात असलेला अॅसिड भातात असलेल्या स्टार्चच्या पचनासाठी आवश्यक असेलेल्या एंजाइमला नष्ट करु शकतो. जर तुम्ही या फळांना एकत्र खाल्ल तर आजाराला आमंत्रण दिलं जाऊ शकतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अननस आणि दूध

अननसात ब्रोमलेन तत्व असतं आणि हे तत्व फक्त अननसातच असतं. हा एक असा एंजाइम आहे, जो अननसाच्या रसातून मिळतो. याचा दूधाशी संपर्क झाल्यास पोटात गॅस, मतली, संक्रमण आणि डोकेदुखीसारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.