‘पावसाळ्यात एसीची काय गरज?’, असेच तुम्हाला वाटत असेल. मात्र आजकाल वर्षाचे बारा महिने एसी लावल्याशिवाय झोप येत नाही,असे सांगणारे महाभाग आपल्याकडे वाढत चालले आहेत.(देश संपन्न होत आहे ना!) वास्तवात होतं असं की ,उन्हाळ्यातल्या उष्म्याच्या दिवसांमध्ये एसीच्या गारेगार हवेमध्ये झोपायची एकदा सवय लागली की पाऊस सुरू झाला तरी लोक एसीमध्येच झोपत राहतात. बघताबघता शरीराला अशी काही सवय लागते की एसी नसेल तर लोक झोपेशिवाय तळमळत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधीकाळी आपल्याकडे पंखे कुठे होते? पण लोक पंख्याशिवाय झोपत होते ना! आपण मात्र आज पंख्याशिवाय झोपू शकत नाही.अगदी तसेच एसीबाबतही होते. थंडी असो वा पावसाळा लोकांना एसीची अशी चटक लागते की एसी शिवाय झोप येत नाही.मात्र हे योग्य नाही.त्यात पावसाळ्यात बाहेरचे वातावरण गार असताना,पाण्याचा वर्षाव होत असताना तर अजिबात योग्य नाही,त्यातही वात व कफ़प्रकृतीच्या मंडळींना.सर्दी-ताप-खोकला-दमा-सायनस असे श्वसनविकार,थंडीताप, सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे-सांधे आखडणे,शरीर जड होणे-आखडणे,एखाद्या अंगावर वा शरीरावर सूज,सांधे-हाडे-स्नायु-कंडरा-नसा यांमधील वेदना वगैरे समस्यांनी त्रस्त रुग्णांना रात्री एसीमध्ये झोपणे बंद केल्यानंतरच त्यांच्या त्यांच्या त्या समस्यांपासुन आराम मिळतो,असा अनुभव उपचार करताना येतो. हे त्रास टाळायचे असतील तर पावसाळ्यात होताहोईतो एसीमध्ये झोपू नका.झोपलात तरी खोलीतले वातावरण २६ अंशाच्या आसपास राहील असे पाहा. अंगावर ऊबदार कपडे घाला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ac is dangerous in rainy season hldc psp
First published on: 07-08-2023 at 15:01 IST