देशासह जगभरात करोना महामारीचा कहर सुरुच आहे. अशा परिस्थितीत आज देशात करोनाचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. पण येत्या १० वर्षात जगावर आणखी एक महामारीचे संकट येण्याचा धोका वर्तवला जात आहे. लंडनस्थित एअरफिनिटी लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, हवामान बदल, आंतरराष्ट्रीय प्रवासातील वाढ, वाढती लोकसंख्या आणि झुनोटिक आजारांची वाढ यामुळे येत्या काही वर्षांत मोठ्या महामारीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय त्यांच्याशी संबंधित एका फर्मच्या अहवालानुसार, (प्रेडिक्टिव हेल्थ अॅनालिटिक्स फर्म) आगामी काही काळात झुनोटिक रोगांचा धोका झपाट्याने वाढू शकतो.

वेगवेगळे विषाणू अधिक वेगाने उद्भवण्याच्या शक्यतेमुळे पुढील दशकात करोनाप्रमाणे प्राणघातक साथीच्या आजारात २७.५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. पण जलद लसीकरणाने ही वाढ रोखली जाऊ शकते, असा दावा आरोग्य विश्लेषण फर्म केला आहे. कोणताही नवीन आजार उद्भवल्यानंतर त्यावर १०० दिवसांनी प्रभावी लसी आणली गेल्यास रोगाची शक्यता ८.१ टक्क्यांपर्यंत घसरते.

Shukra Ast in Mesh
येत्या ४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? मेष राशीत शुक्रदेव अस्त होताच बँक बँलेन्समध्ये होऊ शकते वाढ
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

एअरफिनिटी लिमिटेडच्या मते, जगभरात झुनोटिक आजारांत वाढ होत आहे. दररोज बर्ड फ्लू, माकड, वटवाघुळांमुळे पसरणारे आजार समोर येत आहेत. अशा परिस्थितीत पुढील संभाव्य जागतिक धोक्याची तयारी करण्यावर आरोग्य तज्ज्ञ आपले लक्ष केंद्रित करत आहेत. यात गेल्या दोन दशकात SARS आणि MERS विषाणूंमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यात २००९ मध्ये स्वाइन फ्लूची साथ पसरली होती, तिथे आज करोनाची साथ आहे आणि येत्या १० वर्षात आणखी साथीचे आजार पसरू शकतात, म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे.

यात साथीचे आजार माणसातून माणसात पसरत आहेत. पक्षी आणि इतर जीवांमध्ये जीन म्यूटेशनची उत्पत्ती होणे हे आरोग्य तज्ञ आणि सरकारसाठी चिंतेचे कारण आहे. यात येत्या काही वर्षात ही समस्या झपाट्याने वाढू शकते आणि मोठी महामारी होऊ शकते, असे मानले जात आहे.

यामुळे जगभरातील सर्व आरोग्य विभागांनी सतर्क राहून त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या सर्व बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे, असेही एअरफिनिटीचे म्हणणे आहे. यासोबतच जगातील सर्व मोठ्या देशांनी हवामान बदलाबाबत कठोर नियम बनवण्याची गरज आहे. एवढेच नाही तर लसीकरण करून घेणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे यातून या परिस्थितीतून वाचण्यास मदत होऊ शकते.