scorecardresearch

वेलची लहान पण फायदे महान! ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

वेलची खूप गुणकारी आहे. हिच्या सेवनानं वाढत चाललेलं वजन कमी होतं.

benifit of cardamon
वेलचीमधील गुणधर्म (सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आपण प्रसादाचा शिरा करतो तेव्हा वेलचीची आठवण होते. कुठल्याही गोड पदार्थात वेलची हवीच. ह्याच वेलचीला आयुर्वेदात औषध मानलं गेलं आहे.पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाणारी वेलची किती गुणकारी आहे, याची कल्पना तुम्हाला नाही.तसे आपले मसल्याचे सर्वच पदार्थ फायदेशीर आहेत.त्यात वेलचीचेही भरपूर फायदे आहेत. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. मात्र त्याचे सेवन प्रमाणातच असावे. अतिसेवनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया वेलचीचे अनेक फायदे…

वेलचीमधील गुणधर्म –

वेलचीमध्ये आढळणारे घटक बघितले तर त्यात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस आढळतात. जे निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे अशा स्थितीत पुरुषांनी याचे सेवन नक्की करावे.

फुफ्फुसाचे विकार दूर होण्यास –

वेलची खाल्याने फुफ्फुसात रक्तसंचार जलद गतीने होऊ लागतो. त्याचबरोबर अस्थमा, खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

रक्तदाब नियंत्रित होतो –

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वेलची लाभदायी ठरते. उच्च रक्तदाबामुळे इतर अन्य आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पण दररोज 2-3 वेलची खाल्यास ही समस्या उद्भवण्याला आळा बसेल.

माऊथ फ्रेशनर –

तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तोंडात वेलची टाका. हे एक उत्तम माऊथ फ्रेशनर आहे.

अॅसिडीटीपासून सुटका –

अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.

तणावमुक्त राहण्यासाठी –

तणावमुक्तीसाठी वेलची खाणे फायदेशीर ठरते. तणावात असताना वेलची तोंडात घालून चावा. वेलचीमुळे हार्मोन्समध्ये पटकन बदल होऊन तणावमुक्त होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेवर परिणामकारक

बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास वेलची खा. त्यामुळे पचनक्रीया सुधारेल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या