Breast cancer Awareness Month: ऑक्टोबर हा स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीचा महिना आहे. यावर्षी याची थीम आहे, Every story is Unique, Every Journey Matters. याचाच अर्थ कर्करोगग्रस्त रूग्णाची प्रत्येक कथा अद्वितीय आहे आणि प्रत्येक प्रवास महत्त्वाचा आहे. जागतिक आरोग्य संघटना हा महिना जागरूकतेसाठी असल्याने विविध उपक्रमांचे आयोजन करते.
स्तनाच्या कर्करोगाचे निदान वैयक्तिक असते आणि प्रत्येक निदानामागे एक कहाणी असते. स्तनाचा कर्करोग जगभरातील महिला आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनाला वेगळ्या पद्धतीने स्पर्श करतो. प्रत्येक प्रवास हा करूणा, सन्मान आणि समर्थनास पात्र आहे. यावर्षी स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी जागरूकता वाढवणे आणि वर्तन बदलाला प्रोत्साहन देणे, काळजी घेण्याच्या नवीन पद्धती आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.
स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?
नावाप्रमाणेच स्तनाच्या पेशींमध्ये विकसित होणाऱ्या कर्करोगाला स्तनाचा कर्करोग म्हटले जाते. हा महिलांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत प्रगत वैद्यकीय सुविधांमुळे लवकर निदान होण्यास मदत झाली आहे.
ब्रेस्ट सिस्ट हे एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये आढळते. वृद्धत्व आणि हार्मोनल बदलांसह स्तनातील बदलांमुळे नैसर्गिकरित्यादेखील ही परिस्थिती उद्भवते.
स्तनाच्या कर्करोगाचे प्रकार?
डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, स्तनाचा कर्करोग पेशींमध्ये जलद, अनियंत्रित पेशी विभाजनामुळे होतो. त्या प्रभाव करणाऱ्या ऊतींच्या आधारावर स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
डक्टल कार्सिनोमा- दूध उत्पादक नलिकांचा कर्करोग
लोब्युलर कार्सिनोमा- ग्रंथीच्या ऊतींचे कर्करोग
वर नमूद केलेल्या स्तनाचा कार्सिनोमा आसपासच्या ऊतींमध्ये पसरतो, तेव्हा त्यांना इनवेसिव्ह डक्टल कार्सिनोमा आणि इनवेसिव्ह लोब्युलर कार्सिनोमा म्हणतात.
मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग- स्तनाचा कर्करोग रक्त किंवा लिम्फद्वारे दूरच्या अवयवांमध्ये पसरू शकतो. या प्रक्रियेला मेटास्टेसिस म्हणतात. मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग हाडे, फुप्फुसे, यकृत, ह्रदय आणि मेंदू यांसारख्या अवयवांमध्ये पसरू शकतो.
पुरूष स्तनाचा कर्करोग-क्वचित प्रसंगी पुरूषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान होऊ शकते. पुरूष स्तनाचा कर्करोग साधारणपणे काही औषधे किंवा असामान्य हार्मोन पातळी किंवा स्तन कर्करोगाच्या काही कौटुंबिक इतिहासाचा परिणाम म्हणून होतो.
स्तनाच्या कर्करोगाची कारणे
- संप्रेरके (हार्मोन्स)
- आनुवांशिक किंवा कौटुंबिक इतिहास
- सूज
- जीवनशैली
- पर्यावरणीय घटक
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
- स्तन घट्ट होणे किंवा गाठी होणे, ज्या दुसऱ्या स्तनाच्या ऊतींपेक्षा वेगळी वाटते.
- स्तनाचा आकार किंवा दिसण्यात बदल
- स्तनाच्या त्वचेवर डिंपलिंग किंवा खड्डा पडणे. त्यामुळे ते संत्र्याच्या सालीसारखे दिसते.
- स्तनाग्राभोवती किंवा स्तनावर कुठेही गडद रंगद्रव्य किंवा चकचकीत होणे आणि त्वचा सोलणे
- स्तनाच्या त्वचेचा रंग लालसर दिसणे
- तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे स्वत:मध्ये आढळली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कर्करोगाचा धोका कोणाला?
- ज्या महिलांना वयाच्या ३० वर्षांनंतर मूल झाले
- जास्त वजन
- स्तनाच्या स्थितीचा मागचा वैद्यकीय इतिहास
- बहीण, आई किंवा मुलगी यांची कर्करोगाची प्रकरणे
- पोस्ट मेनोपॉझल हार्मोन थेरपी घेणाऱ्या महिला
- किरणोत्सर्गाचा दीर्घकाळ संपर्क
- मासिक पाळीला लवकर सुरूवात
- जास्त प्रमाणात मद्यपान
- आनुवांशिक घटक
कर्करोग टाळता येऊ शकतो का?
- स्तनाच्या कर्करोगाची योग्य वेळी जागरूकता अनेकांचे जीव वाचवू शकते.
- स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा.
- तुमच्या स्तनाच्या संरचनेकडे स्वत: लक्ष द्या आणि नियमितपणे स्तनांची आत्म तपासणी करा. हे रोग टाळू शकत नाही मात्र, निदान लवकर झाल्यास आणि व्यवस्थापनात नक्कीच मदत करू शकते.
- तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणी नियमित करा
- धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन बंद करा
- नियमित व्यायाम करा आणि निरोगी वजन राखा.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पहिला प्रश्न मनात येतो तो आता किती काळ जगणं शक्य आहे? पण हा केवळ अंदाज आहे. स्टेज-१ कर्करोगात १०० टक्के रूग्ण जगू शकतो. स्टेज-२मध्ये ९३ टक्के रूग्ण जगू शकतो. स्टेज-३ मध्ये ७२ टक्के रूग्ण जगू शकतात आणि स्टेज-४ मध्ये २२ टक्के रूग्ण जगण्याचा अंदाज असतो.